virat kohli dropped steve smith catch, IND vs AUS: विराट प्लीझ अशी चूक पुन्हा नको करू; मॅच नाही तर मालिका देखील गमवू – virat kohli dropped steve smith catch and made a record to left 100 catches ind vs aus 1st test nagpur watch video
नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलियाचे दोन्ही संघ आजपासून कसोटी मालिकेत एकमेकांविरुद्ध अटीतटीची लढत देताना दिसणार आहेत. या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने सामन्यावर आपली मजबूत पकड ठेवली आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या ३ षटकात भारताने कांगारू संघाला दोन धक्के दिले. तर नंतर आलेल्या मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. अक्षर पटेलने स्टीव्ह स्मिथला बाद करण्याची संधी निर्माण केली, मात्र विराट कोहलीने संघाला मोठा धक्का दिला आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वात चपळ खेळाडू मानला जातो. तो एक जबरदस्त क्षेत्ररक्षक देखील आहे, परंतु बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ च्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने नागुपारमध्ये एक लाजिरवाणा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० झेल सोडण्याचा हा विक्रम आहे. विरोधी फलंदाज स्टीव्ह स्मिथचा झेल सोडताना हा विक्रम त्याच्या नावावर झाला. यापूर्वी त्याने ९९ झेल सोडले होते, तर हा १०० वा झेल होता. त्याने आपल्या कारकिर्दीत २९५ झेल घेतले आहेत. IND vs AUS: पहिल्या विकेटचा खरा जल्लोष ड्रेसिंग रूममध्ये झाला, द्रविड यांच असं रूप पुन्हा पुन्हा पाहाल
टीम इंडियाने डावाच्या सुरुवातीला दोन विकेट्स गमावल्यानंतर, कसोटीचा अव्वल क्रमांकाचा फलंदाज मार्नस लॅबुशेन क्रीझवर उतरला, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेला स्टीव्ह स्मिथ त्याला साथ देण्यासाठी आला. या दोघांनी आधी वेगवान गोलंदाजांची जोरदार धुलाई केली, नंतर अक्षर पटेलने येताच दोन्ही फलंदाजांना आपल्या फिरकीने त्रास देण्यास सुरुवात केली. डावाच्या १५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने स्टीव्ह स्मिथला हुलकावणी दिली आणि चेंडू थेट स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीकडे गेला. मात्र, कोहलीला योग्य वेळी खाली वाकता आले नाही आणि चेंडू हाताला लागून जमिनीवर पडला. चेंडूचा थोडा वेगवान होता, त्यामुळे कोहलीला काही समजण्याआधीच चेंडू त्याच्या हाताला निसटला. त्यामुळे सर्वच चकित झाले होते.