नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. दोन्ही संघात आज ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे पहिली कसोटी मॅच सुरू झाली आहे. भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा फक्त १७७ धावांवर ऑलआउट करत मॅचवर पकड मिळवली आहे. अशात ऑस्ट्रेलियाच्या एका माजी दिग्गज क्रिकेटपटूबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

गेल्या वर्षी वयाच्या ५२व्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नचे निधन झाले होते. वॉर्नच्या अचानक निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का बसला होता. वॉर्नच्या निधनानंतर ११ महिन्यांनी त्याच्या एकूण संपत्तीबद्दल माहिती समोर आली आहे. वॉर्नच्या इछापत्रातून ही गोष्ट प्रथमच समोर आली आहे की त्याच्याकडे किती संपत्ती होती आणि ती कोणाला मिळणार आहे.

शेन वॉर्नकडे १२० कोटी रुपयांची संपत्ती आहे. मृत्यूच्या आधीच वॉर्नने ही संपत्ती त्याच्या तिनही मुलांच्या नावाने समानरित्या वाटली होती. वॉर्नच्या तिनही मुलांना संपत्तीतील प्रत्येकी ३१ टक्के हिस्सा देण्यात आला आहे. या शिवाय शिल्लक संपत्ती त्याने भाचा-भाची यांच्या नावावर केली आहे. वॉर्नला जॅक्सन, ब्रूक आणि समर अशी ३ मुलं आहेत. या तिघांनी प्रत्येकी ३१ टक्के संपत्ती मिळणार आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे वॉर्नने त्याची घटोस्फोटीत पत्नी आणि प्रेयसीच्या नावावर एक रुपया देखील ठेवलेला नाही.

फक्त शमीने घेतलेल्या बोल्डचा आवाज ऐका; धारधार चेंडूवर काही फुटांवर पडली विकेट, Video
शेन वॉर्नला कार आणि मोटरसायकलची आवड होती. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात कार आणि मोटरसायकली होत्या. यात यामाहा देखील होती. गाड्यांमध्ये त्याला BMW आणि मर्सिडीज खुप आवडत होत्या. या सर्व गाड्या त्याने मुलगा जॅक्सनच्या नावावर ठेवल्या आहेत.

नागपूर कसोटी भावूक क्षण; क्रिकेटपटूच्या पदार्पणासाठी उपस्थित होती आई, टेस्ट कॅप मिळताच मुलाला…
शेन वॉर्नची कामगिरी

शेन वॉर्नने १४५ कसोटीतील २७३ डावात ७०८ विकेट घेतल्या होत्या. ७१ धावांवर ८ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. वनडेत वॉर्नने १९४ सामन्यात २९३ विकेट घेतल्या. ३३ धावात ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा तो कर्णधार होता आणि पहिल्या हंगामाचे विजेतेपद त्याने मिळवून दिले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here