भारत आणि ऑस्ट्रेलिया गावस्कर-बॉर्डर करंडक मालिकेतील पहिला कसोटी सामना आज नागपूरमध्ये होतोय. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याच्या अंगलट आला. भारतीचे फिरकीपटू आर अश्विन आणि रविंद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना विकेट्सवर टिकण्याची संधीच दिली नाही. अश्विनने ३ आणि रविंद्र जाडेजाने ५ विकेट्स घेत कांगारुंचं कंबरडं मोडलं. केवळ १७७ धावांत भारतीय फिरकीपटूंनी कांगांरुंचा खुर्दा उडवला.
भारतीय डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित-राहुलची जोड मैदानात उतरली. ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सच्या पहिल्याच बॉलवर रोहित थोडक्याच वाचला. त्याच्या बॅटची कड घेऊन बॉल स्लीपमधून सीमरेषेपार गेला. नंतरच्या दोन्ही चेंडूवर रोहितने कमिन्सवर हल्ला चढवला. दोन्ही चेंडूवर रोहितने दोन खणखणीत चौकार लगावले. कमिन्सच्या पहिल्याच ओव्हरमध्ये रोहितने १३ धावा काढल्या.
के एल राहुलला रन्स करण्यासाठी झगडावं लागतंय. अतिशय संथ गतीने राहुलची इनिंग सुरु आहे. पण रोहित शर्मा ड्रेसिंग रुममधून सेट होऊन आल्यासारखी बॅटिंग करत आहे. रोहितने अवघ्या ६६ चेंडूत अर्धशतक झळकावलं. या दमदार खेळीला रोहितने ९ चौकार आणि १ षटकाराचा चढवला. सध्या रोहित (२२. ३ ओव्हरपर्यंत) ६७ चेंडूत ५५ धावांवर तर राहुल ७० चेंडूत २० धावांवर बॅटिंग करत आहे.
अश्विन-जाडेजाच्या जादूसमोर ऑस्ट्रेलिया फिकी
नागपूर कसोटीत रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने शानदार बोलिंग केली. जाडेजाने पुनरागमनाच्या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या. तर अश्विननेही ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. अश्विन-जाडेजाच्या या शानदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियन संघ १७७ धावांत ऑलआऊट झाला. तत्पूर्वी, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला आऊट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० बळी पूर्ण केले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times