आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर १०० शतकांचा आणि सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर सचिनला नेहमीच आदर्श खेळाडू म्हणून पाहले गेले. असे असून भारताच्या माजी कर्णधाराने सचिनच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
वाचा-
देशाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे माजी कर्णधार यांनी सचिनला कसोटी क्रिकेटमध्ये अधिक द्विशतक करता आले नाहीत याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक डब्ल्यू व्ही रमन यांच्याशी एका मुलाखतीत बोलताना कपिल म्हणाले, सचिनला शतक कसे करायचे हे माहित होते. पण त्या शतकाचे द्विशतक आणि त्रिशतक कसे करायचे याची कला त्याला येत नव्हती.
वाचा-
सचिनने विरेंद्र सेहवाग, जावेद मियाँदाद, रिकी पॉन्टिंग, युनुस खान आणि मार्वन अट्टापट्टू यांच्या प्रमाणे कसोटी ६ द्विशतक केली आहेत. तरी देखील कसोटी सर्वाधिक द्विशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो १२व्या स्थानावर आहे. हे यासाठी महत्त्वाचे आहे की त्याने सर्वाधिक २०० कसोटी सामने खेळून देखील फक्त ६ द्विशतक केली. या यादीत ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन १२ द्विशतकांसह पहिल्या स्थानावर आहेत. कपिलने सचिनच्या या कौशल्यावर प्रश्न उपस्थित केला.
कपिल म्हणाले, जलद आणि फिरकीपटू या दोन्ही गोलंदाजांच्या प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार मारण्याची क्षमता सचिनकडे आहे. अशा परिस्थितीत कसोटी त्याच्या नावावर ५ त्रिशतक आणि १० द्विशतक हवे होते. पण सचिनला एकही त्रिशतक करता आले नाही.
सांगितला सचिनमधील हा दोष
सचिनला कसोटी कमी द्विशतक करता आले यासाठी कपिलने सचिनच्या सुरुवातीच्या क्रिकेट करिअरला जबाबदार ठरवले. सचिन मुंबईचा आहे. त्यामुळे त्याची अशी मानसिकता आहे की शतक झाल्यानंतर एक नवी सुरुवात करतो. पण मला ही पद्धत आवड नाही. मी सचिनला म्हटेल होते की, तु एक शानदार फलंदाज आहेस गोलंदाजांनी तुला घाबरले पाहिजे. पण सचिन शतक झाल्यानंतर वेगाने खेळण्या ऐवजी सिंगल्स घ्यायचा.
वाचा-
१९९९ साली पहिले द्विशतक
सचिनने कसोटीत सर्वाधिक ५१ शतक केली आहेत. त्याला करिअरमधील पहिले द्विशतक करण्यासाठी १० वर्ष लागली. १९९९ साली न्यूझीलंडविरुद्ध सचिनने हैदराबाद येथे पहिले द्विशतक केले. सचिनच्या ५१ शतकांमध्ये फक्त २० अशी शतक आहेत ज्यात त्याने १५० पेक्षा अधिक धावा केल्यात. अर्थात वनडे क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
त्याने २०१० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत द्विशतक केले होते. २०१३ साली निवृत्त झालेल्या सचिनने २०० कसोटीत ५४.०४च्या सरासरीने १५ हजार ९२१ धावा केल्या आहेत. तर ४६३ वनडेत ४४.८३च्या सरासरीने १८ हजार ४२६ धावा केल्यात.
भारताकडून कसोटी सर्वाधिक द्विशतक करण्याचा (Most Double Hundred by Indian)विक्रम विद्यमान कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने सात द्विशतक केली आहेत. तर विरेंद्र सेहवागने दोन आणि करुण नायरने एक त्रिशतक झळकावले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Great article Lot’s of information to Read…Great Keep Posting and update to People..Thanks
okbet philippines
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
A big thank you for your article.
Thanks so much for the blog post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.