जडेजा आणि रोहित शर्माला मॅच रेफरीने बोलावले
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात खेळल्या जात असलेल्या कसोटीत पहिला दिवस संपल्यानंतर सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी रवींद्र जडेजा, रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापकाला बोलावले होते. तिघेही तिथे पोहोचताच रेफ्रींनी त्यांना जडेजाच्या हातावर क्रीम लावतानाचा व्हिडिओ दाखवला. यावर संघ व्यवस्थापनाने सांगितले की ही एक वेदना कमी करणारी क्रीम आहे. त्यावर पंचांनी उत्तर दिले की, ते यावर कोणतीही कारवाई करणार नाहीत.
हे संपूर्ण प्रकरण काय होते
खरं तर, ऑस्ट्रेलियाच्या डावात रवींद्र जडेजाने लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथला बाद केले, त्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये जडेजा हातावर क्रीम लावताना दिसत आहे, मात्र तो चेंडूला काहीही लावत नसल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. असे असूनही, ऑस्ट्रेलियन मीडिया त्याच्यावर ‘बॉल टॅम्परिंग’चे खोटे आरोप करू लागले. ऑस्ट्रेलियन संघाने या प्रकरणी कोणतीही तक्रार केलेली नाही.
पण यावरून ऑस्ट्रेलियन मीडिया आणि चाहत्यांमध्ये चांगलेच घमासान सुरु होते. टीम इंडियाच्या चाहत्यांनी त्यांना चांगलीच उत्तरे दिली आहेत. यावरचे अनेक मिम्स सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. यावरून स्टीव्ह स्मिथ आणि त्याचसोबत मागे घडलेला बॉल टॅम्परिंगचा मुद्दा पुन्हा चर्चचा विषय ठरला.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलियाचा संघ-
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ , पीटर हॅड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), नाथन लियोन, टॉड मर्फी , स्कॉट बोलँड
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times