rohit sharma water bottle, एकही दिल है! मैदानात नाही तर मैदानाबाहेर जिंकलं मन, रोहितच्या या कृतीचं होतय कौतुक – rohit sharma mohammed siraj share same water bottle fans reaction ind vs aus 1st test
नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूर येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिली ट्रेस्ट सुरू आहे. पहिल्याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर संपुष्ठात आणला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील पहिली विकेट मोहम्मद सिराजने घेतली. त्याने उस्मान ख्वाजाला बाद केले. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ५ तर अश्विनने ३ विकेट घेतल्या. इतक नाही तर कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली.
जडेजा आणि अश्विनच्या शानदार गोलंदाजीनंतर देखील चर्चा सुरू आहे ती रोहित शर्माच्या एका कृतीची. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू असताना रोहित शर्माने मैदानावर अशी एक कृती केली ज्यावर चाहते त्याचे कौतुक करत आहेत. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या डावात १०व्या षटकात ड्रिंक्ससाठी ब्रेक घेण्यात आला. ५ जणांवर अन्याय करून एवढी मेहरबानी कशासाठी? उपकर्णधाराचे रेकॉर्ड बघून तुम्हीच ठरवा संघात काय चाललंय ड्रिंक्स ब्रेकच्या वेळी जलद गोलंदाज मोहम्मद सिराजने होट लावत बाटलीतील पाणी पिले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने त्याच बाटलीतील पाणी घेतले.
क्रिकेटपटूच्या निधनानंतर ११ महिन्यानंतर समोर आली १२० कोटींची संपत्ती; कोणाला काय मिळणार? या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो चाहते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. प्रत्येक जण रोहित शर्माच्या त्या कृतीची चर्चा करत आहेत. ही घटना चर्चे येण्याचे आणखी एक कारण म्हणजे, नागपूर कसोटी सुरू होण्याआधी भारतीय संघातील खेळाडू जेव्हा हॉटेलमध्ये प्रवेश करत होते तेव्हा मोहम्मद सिराज याने त्याचे स्वागत करणऱ्यांकडून टिळा लावून घेतला नाही. सिराजसह उमरान मलिक, फलंदाजीचे कोच विक्रम राठोड आणि कोचिंग स्टाफ हरी यांनी टिळा लावून घेतला नव्हता.