बुमराह कसोटी मालिकेतून बाहेर झाला असला तरी त्यानंतर होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत तो खेळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. टेलिग्राफने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार बुमराह सध्या फीट आहे आणि तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅबमध्ये आहे. त्याने गोलंदाजीचा सराव देखील सुरू केला आहे. बुमराहने एनसीएमध्ये सराव सुरू केला असून तो चागंली कामगिरी करतोय. गोलंदाजी करताना तो फिट दिसतोय असे, टेलिग्राफने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
भारताचा आघाडीचा जलद गोलंदाज बुमराहने दुखापतीमुळे गेल्या सप्टेंबर महिन्यापासून एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यासाठी त्याची निवड देखील झाली नव्हती. आता त्याने NCAमध्ये सराव सुरू केला आहे. पण मालिकेतून बाहेर झाल्याने चाहते निराश झाले आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडेनंतर कर्णधार रोहित शर्माने बुमराहबद्दल अपडेट दिले होते. मला आशा आहे की बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटीत खेळेल. पण आम्ही कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणार नाही. पाठीची दुखापत ही गंभीर असते, म्हणूनच त्याला फिट होण्यासाठी पूर्ण वेळ दिला जाईल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times