नागपूर : आपल्या तडफदार फलंदाजीमुळे सूर्यकुमार यादव हा कायम चर्चेत असतो. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळालं आहे. सूर्यकुमार हा यंदाच्या हंगामात दोन रणजी चषक सामने खेळला आहे. आता या अनुभवी क्रिकेटपटूने अनोखा विक्रम केला आहे. रवी शास्त्री यांनी त्याला पदार्पणाची कसोटी कॅप दिली, त्या क्षणी त्याने एक अनोखा विक्रम रचला.

काय आहे अनोखा विक्रम?

सूर्यकुमार यादवा हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे ज्याने वयाच्या तिशीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. सूर्यकुमार टी-२० आणि वनडे सामने खेळला आहे. पण कसोटी सामन्यात त्याचं पदार्पण झालं नव्हतं. अखेर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला ही संधी मिळाली. आणि वयाच्या (३०) तिशीनंतर त्याने कसोटी खेळत हा अनोखा विक्रम केला आहे.

सूर्यकुमार यादवने बॉर्डर गावसकर चषक नागपूरमध्ये होत असलेल्या कसोटीत डेब्यू केला. वयाच्या तिशीनंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा तो पहिला खेळाडू ठरला आणि कसोटी सामना खेळण्याची त्याला संधी मिळाली. टी-२० आणि वनडे प्रमाणेच सूर्यकुमार कसोटी सामन्यातही चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात सूर्यकुमार फारकाही चांगली खेळी करू शकला नाही. सूर्यकुमार ८ धावांवर बाद झाला.


सूर्यकुमारने चौकार मारून आपलं खातं उघडलं. मर्फीच्या चेंडूवर स्वीपर करत सूर्यकुमारने हा चौकार लगावला. सूर्यकुमार टी-२० च्या अंदाजातच नागपूर कसोटीत कामगिरी करेल, असं मानलं जात होतं. पण यानंतर सूर्यकुमार थोडा संथ झाला आणि ८ धावांवर बाद झाला.

आगीच्या गोळ्या सारखा होता तो चेंडू; स्टंप फक्त हवेत उडलेला दिसला, अशी निघाली रोहितची विकेट
सूर्यकुमारला ६०व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटू नाथ लायन याने क्लिन बोल्ड केलं. लायन याच्या फिरकी चेंडूवर सूर्या पूर्ण गोंधळला. कवर ड्राइव्ह मारण्याच्या प्रयत्नात होता. पण चेंडू फिरला अन् बॅट आणि पॅडच्या मधून थेट स्टंप घेऊन उडाला. लायन या चेंडूने सर्वांना शेन वॉर्नच्या बॉल ऑफ द सेंच्युरीची आठवण करून दिली. चेंडू इतका फिरला की फिरकी खेळणाऱ्या सूर्याला कळलचं नाही.

Rohit Sharma Hundred: कसोटीत देखील रोहितच हिटमॅन; पहिल्या कसोटीत केलं विक्रमी शतक

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here