करोनाच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या चाहत्यांना एक गूड न्यूज दिली आहे. आयसीसीच्या क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीगला उद्या गुरुवापासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांना गुरुवारपासून लाईव्ह सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे.

करोनाच्या काळात क्रिकेट जवळपास चार महिने ठप्प होते. पण त्यानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. ही मालिका इंग्लंडने २-१ अशा फरकाने जिंकली. आता आयसीसीची क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीग ही स्पर्धा आता ३० जुलैपासून सुरु होणार आहे.

आयसीसीची क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीग ही स्पर्धा भारतामध्ये २०२३ साली खेळवणाऱ्या विश्वचषकासाठी खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण १३ संघांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये तेरावा संघ हा नेदरलँड्सचा असणार आहे. या स्पर्धेत आता भारतीय संघ कधी दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

पहिली पात्रता स्पर्धा विश्वविजेता इंग्लंड आणि आयर्लंड या दोन देशांमध्ये होणार आहे. या दोन देशांतील मालिकेला ३० जुलैपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंडचा संघ कशी कामगिरी करतो. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. पण आयर्लंडचा संघ इंग्लंडला धक्का देणार का, याची उत्सुकताही चाहत्यांना आहे.

स्पर्धेची आखणी असेल तरी कशी…आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीतील पहिल्या सात संघांना विश्वचषकात थेट प्रवेश दिला जातो. भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या पात्रतेसाठी १३ संघ मैदानात उतरणार आहेत. यामध्ये तेरावा संघ हा नेदरलँड्सचा आहे. कारण त्यांनी २०१५-१७ या कालामधीमध्ये खेळवण्यात आलेल्या आयसीसीच्या सुपर लीग स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे त्यांना पात्रता स्पर्धेत सामील करण्यात आले आहे.

या पात्रता स्पर्धांमध्ये दोन देशांमध्ये तीन सामन्यांच्या प्रत्येकी आठ मालिका खेळवण्यात येतील. यावेळी चार मालिका या घरच्या मैदानावर आणि चार मालिका या प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात खेळाव्या लागणार आहे. या स्पर्धेत एका सामन्यात विजयी झाल्यास संघाला १० गुण मिळणार आहेत. त्याचबरोबर सामना बरोबरीत सुटला किंवा रद्द झाला तर प्रत्येक संघाला प्रत्येकी पाच गुण देण्यात येतील.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here