पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियन टीमला अक्षरश: सळो की पळो करून सोडलं. जो संघ भारताला ४-० हरवण्याचं स्वप्न पाहात होता त्यांना नागपूर टेस्टमध्ये टीम इंडियानं दिवसाचे तारे दाखवले. भारतानं ही मॅच तब्बल १३२ धावांनी जिंकली. खरं तर या सामन्यात आणखी ३ दिवस बाकी होते. पण भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज काही टिकू शकले नाहीत. परिणामी भारतानं अगदी सहजरित्या ही मॅच जिंकली. मॅच जिंकल्यानंतर भारतीय फॅन्स देखील सैराट झाले आहेत. मीम्सच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन टीमची खिल्ली उडवत आहेत. चला तर मग पाहूया व्हायरल होणारे जबराट मीम्स. (फोटो सौजन्य – @WasimJaffer14/Twitter) पप्पांच्या परीचा खतरनाक कारनामा, व्यायाम करणाऱ्या तरुणाला गाडीनं उडवलं

धू धू धुतलं!

पाहुण्यांसोबत हे कोण करतं?

यांनी तर ११ च्या ११ बॅट्समन भरले होते.

भारत कुठल्या खेळपट्टीवर खेळत होता?

टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासोबत हे केलं

ऑस्ट्रेलियाला असा बसला मार

D for Drop

ऑस्ट्रेलियाला खेळपट्टी अशी दिसत होती.

भारतानं ऑस्ट्रेलियाला सहज हरवलं

भारतानं ऑस्ट्रेलियाला सहज हरवलं

ऑस्ट्रेलियानं पहिली बॅटिंग करून १७७ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियानं स्वस्तात बाद होण्याचं खापर खेळपट्टीवर फोडलं होतं. खेळपट्टी खराब असल्यामुळे फलंदाजांना बॅटिग करणं कठीण गेलं असा दावा ऑस्ट्रेलियन मीडिया करत होती. पण त्याच खेळपट्टीवर भारतानं मात्र ४०० धावा केल्या. एवढंच नव्हे तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांना ९१ धावांवर बाद करून तीसऱ्याच दिवशी १३२ धावांनी मॅच जिंकली. ४ सामन्यांच्या या मालिकेत भारतानं १-० अशी आघाडी घेतली आहे. भारत ही मालिका ४-० नं जिंकेल अशी अपेक्षा केली जात आहे. (फोटो सौजन्य – @JayShah/Twitter)

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here