नागपूर: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली कसोटी जिंकली आहे. नागपूर येथे झालेल्या सामन्यात भारताने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १७७ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल भारताने ४०० धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव फक्त ९१ धावांवर संपुष्ठात आला. भारताच्या या विजयाचा सर्वात मोठा फायदा संघाला आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात झाला आहे.

टेस्ट चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या हंगामात ऑस्ट्रेलियाचा हा फक्त दुसरा पराभव आहे. १६ पैकी त्यांनी १० मध्ये विजय मिळवला आहे तर ४ लढती ड्रॉ झाल्या आहेत. त्यांची विजयाची टक्केवारी ७०.८३ इतकी आहे. गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. १५ सामन्यातील विजयासह भारताची विजयाची टक्केवारी ६१.६६ इतकी आहे. भारताने १५ पैकी ९ सामन्यात विजय मिळवला आहे.

IND vs AUS: विजय भारताचा, चर्चा फक्त मोहम्मद शमीची; असा विक्रम केला की विराट-युवी मागे पडले
आयसीसीने यावेळी गुण देण्याची पद्धत थोडी बदलली आहे. यावेळी विजयासाठी १२ गुण, ट्राय झाल्यास ६, ड्रॉ झाल्यास ४ तर पराभवाला काहीच गुण नाही. टक्केवारीचा विचार करता विजयानंतर १०० टक्के, ट्रायसाठी ५० टक्के, ड्रॉ झाल्यास ३३.३३ टक्के मिळतात.

जडेजाला स्वप्नात देखील वाटले नाही त्याच्या सोबत असं होईल; मर्फीचा चेंडू असा वळला की…
असा आहे भारताचा फायनलचा मार्ग…

WTC गुणतक्त्यात भारत दुसऱ्या स्थानावर, श्रीलंका तिसऱ्या तर द.आफ्रिका चौथ्या स्थानावर आहे. आफ्रिकेला वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर दोन मॅच खेळायच्या आहेत. जर त्यांनी दोन्ही लढती जिंकल्या तर विजयाची टक्केवारी ५५.५५ होईल. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दोन मॅच जिंकल्या तर विजयाची टक्केवारी ५६.९४ इतकी होईल. याचा अर्थ भारताने मालिकेतील अजून एक मॅच जिंकली तर ते आफ्रिकेच्या पुढे राहतील.

आगीच्या गोळ्या सारखा होता तो चेंडू; स्टंप फक्त हवेत उडलेला दिसला, अशी निघाली रोहितची विकेट
श्रीलंकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी खेळायच्या आहेत. जर त्यांनी या दोन मॅच जिंकल्या नाही तर भारत WTCच्या फायनलमध्ये पोहोचेल आणि फायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल. जर श्रीलंकेने दोन्ही मॅच जिंकल्या तर त्यांची टक्केवारी ६१.११ होईल. अशा परिस्थितीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चारही मॅच जिंकाव्या लागतील. अर्थात श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध दोनही टेस्ट जिंकणे अवघड आहे. जर त्यांनी एक मॅच गमावली किंवा ड्रॉ झाली तर भारत अंतिम फेरीत पोहोचेल.

ऑस्ट्रेलियाचे अंतिम फेरीत पोहोचणे जवळ जवळ पक्के आहे. जर भारताविरुद्धच्या ४ सामन्यात त्यांचा ४-० असा पराभव झाल तर ते गुणतक्त्यात टॉप २ मध्ये राहतील.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here