करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला देशात वाईट परिस्थिती सुरु आहे. सरकार कोव्हिडबरोबर लढण्यासाठी सर्वतोपरी उपाय करताना दिसत आहे. पण आपली लोकसंख्या पाहता हे उपाय कमी पडताना दिसत आहेत. पण जेव्हा वाईट परिस्थिती निर्माण होते, तेव्हाच देवाचे रुप पाहायला मिळते, असे म्हटले जाते. सध्याच्या घडीला सामन्य लोकांसाठी एक क्रिकेटपटू देव झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या विश्वविजेत्या खेळाडूने कोव्हिड सेंटर उभारल्याचे पाहायला मिळत आहे.

करोना झालेल्या लोकांची संख्या वाढत असल्यामुळे सर्व जणांवर रुग्णालयात उपचार करणे शक्य होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. पण ज्या व्यक्तीला करोना झाला आहे, त्याची आबाळ होत कामा नये. त्याला चांगले उपचार आणि जेवण मिळावे, असा विचार भारताच्या एका विश्वविजेत्या क्रिकेटपटूने केला आहे. त्यामुळेच त्याने एका कोव्हिड सेंटरलची उभारणी केली आहे आणि लोकांना मोफत उपचार आणि जेवण कसे मिळेल, यासाठी तो प्रयत्नशील आहे.

या क्रिकेटपटूच्या गावामध्ये करोना म्हणजे नेमकं काय आणि त्यावर काय उपाययोजना करायला हव्यात, हे लोकांना माहिती नव्हते. क्रिकेटपटूच्य गावात बाहेरील राज्यातून पाच करोनाचे रुग्ण आलेले होते. त्यामुळे गावकऱ्यांना करोनाचा धोका जास्त होता. पण लोकांना याबाबत काहीच माहिती नव्हते. त्यामुळे संपूर्ण गावात हा क्रिकेटपटू जनजागृती करत फिरत होता. तोंडाला मास्क का लावावेत, सुरक्षित अंतर कसे ठेवावे, आपले हात कसे स्वच्छ करावेत, याबाबतची माहिती तो सर्वांच्या घरी जाऊन देत होता. पण आता तर त्याने त्यापुढचेही काम केले आहे. आता या क्रिकेटपटूने आपल्या गावात चक्क कोव्हिड सेंटर स्थापन केले आहे.

गुजरातमधील भरुच या गावात भारताच्या विश्वविजयी संघातील क्रिकेटपटू मुनाफ पटेल हा राहत आहे. पण गावकऱ्यांना करोनाबद्दल काहीही माहिती नव्हती. पण जर गावात करोनाचे रुग्ण आढळले तर त्यांचे उपचार कुठे होणार, हा प्रश्न त्याला पडला. त्यामुळे त्याने आपल्या गावात कोव्हिड सेंटरची उभारणी केल्याचे पाहायला मिळते आहे.

ज्या व्यक्तींना करोनाची लक्षण आढळतील त्यांना या कोव्हिड सेंटरमध्ये ठेवले जाऊ शकते. त्याचबरोबर या रुग्णांवर योग्य ते उपचार आणि त्यांना दोन वेळचे चांगले जेवण मिळावे, यासाठी हा क्रिकेटपटू कटिबद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे. करोडो रुपये कमावलेले खेळाडू काहीही करताना दिसत नसले तरी मुनाफ हा सामान्य माणसांसाठी मदतीचा हात देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here