पाकिस्तानच्या संघानं उभारलेला धावांचा डोंगर सर
पाकिस्तानच्या महिला संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियापुढं धावांचा डोंगर उभा केला होता. पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ विकेट गमावून १४९ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून बिस्माह हिनं ६८ धावांची खेळी केली होती. बिस्माहला आयेशा हिनं साथं देत ४३ धावा केल्या होत्या. या दोघींच्या खेळीच्या जोरावर पाकिस्ताननं १५० धावांचं लक्ष भारतासमोर उभं केलं होतं. मात्र, भारताच्या लेकींनी हे आव्हान ७ विकेट राखत पार केलं.
शफियानं पाया रचला, जेमियानं विजयाची पताका फडकावली
भारतानं पाकिस्ताननं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना संयमीपणे सुरुवात केली होती. भारताकडून शफाली वर्मानं सलामीपासून आक्रमक पवित्रा घेत फलंदाजी केली. शफालीनं २५ बॉलमध्ये ३३ धावा केल्या. शफाली वर्मा बाद झाल्यानंतर सामन्याची सर्व सूत्रं जेमिया आणि रिचानं हातात घेतली. जेमियानं ३८ बॉलमध्ये बिनबाद ५३ धावांची खेळी केली. तर, रिचानं तिला साथ देत २० बॉलमध्ये ३१ धावांची खेळी केली. दोघींच्या खेळीच्या जोरावर भारतानं विजयाची पताका फडकावली.
जेमिया आणि रिचाची विजयी भागिदारी
भारताने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला आहे. भारताने १५० धावांचे लक्ष्य ६ चेंडू बाकी असताना पूर्ण केले. एकावेळी तीन विकेट्स गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता, मात्र जेमिमा आणि रिचा यांनी शानदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. रिचा आणि जेमिमा यांनी ५८ धावांची नाबाद भागीदारी केली. जेमिमाने ३८ चेंडूंत ८ चौकारांसह ५३ धावा केल्या. त्याचवेळी ऋचा घोषने २० चेंडूत पाच चौकार मारले. रिचाने ३१ धावांची आक्रमक खेळी केली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times