मुंबई : सोशल मीडियाची जमेची बाजू कशी असू शकते याची उदाहरण आपल्यासमोर अनेकदा येत असतात. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भाषण करणारा चिमुकला व्हायरल झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्या कार्तिक वजीरची दखल घेतली होती. बीड जिल्ह्यातील ऊसतोड करणार दाम्पत्याचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता. गेल्या आठवड्यात सांगली जिल्ह्यातील विजेच्या कनेक्शनसाठी अधिकाऱ्यासोबत इंग्रजीतून संवाद साधणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दुसऱ्याच दिवशी त्या शेतकऱ्याला वीज जोडणी महावितरणकडून देण्यात आली होती. आता बेळगावमधील क्रिकेट स्पर्धेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. किरण तरळेकरच्या कॅचचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला असून इंग्लंडच्या माजी कर्णधारानं देखील याची दखल घेतली आहे.

सचिन तेंडुलकर ते मायकल वॉनकडून कौतुक

सचिन तेंडुलकरनं किरण तरळेकरनं घेतलेल्या कॅचची दखल घेतली आहे. हा अफलातून कॅच घेणाऱ्या खेळाडूला देखील फुटबॉलची नक्की माहिती असेल, असंही सचिन तेंडुलकर म्हणाला होता. आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननं देखील हा व्हिडिओ रीट्विट करत “ग्रेटेस्ट कॅच ऑफ ऑल टाइम” असं कॅप्शन दिलं आहे.

भाजप समर्थकांचा सभेवेळी फटाके फोडत डिवचण्याचा प्रयत्न, अजित पवारांकडून खास स्टाईलमध्ये प्रत्युत्तर

रोहित पवारांकडून दखल

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी देखील किरण तरळेकर यानं घेतलेल्या कॅचची दखल घेतली आहे. रोहित पवार यांनी किरण तरळेकर याला आपण लवकरच भेटू असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार यांनी किरण तरळेकर हा चांगला खेळाडू असून भविष्यात त्याला चांगली संधी मिळेल, असं म्हटलं आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याबाबत आली मोठी बातमी, बीसीसीआयने तिसऱ्या कसोटी सामन्याचे ठिकाणच बदलले

सोशल मीडियावर चर्चा

बेळगावमध्ये श्री चषक २०२३ ही स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेत एसए वॉरिअर्स आणि एसआरएस हिंदुस्थान यांच्यात सामना सुरु होता. त्या सामन्यातील किरण तरळेकर यांनी सीमा रेषेवर घेतलेल्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. क्रिकेटप्रेमींनी किरण तरळेकर यांनी घेतलेल्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता, बेळगावातील क्रिकेट सामन्यातील व्हिडिओ थेट जगभर पोहोचला आहे.

हिंडेनबर्गच्या खेळीने अदानींच्या शेअर्सची ‘पॉवर’च संपवली; आज काय हाल झाले बघा!

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here