दिनेश कार्तिकने ट्विट करून मल्लिका सागरचे अभिनंदन केलंय. मल्लिका ही एक उत्तम आणि उत्कृष्ट लिलावकर्ता आहे. आत्मविश्वासाने परिपूर्ण, स्पष्ट आणि अत्यंत संतुलित… महिला प्रीमियर लीगच्या लिलाव सोहळ्या तिला लिलावकर्त्याची भूमिका पार पाडायला दिल्याबद्दल बीसीसीआयचे खूप खूप अभिनंदन…. असं दिनेश कार्तिकने ट्विटमध्ये म्हटलंय. मल्लिकाचं कौतुक करताना तसेच बीसीसीआयने तिला संधी दिल्याबद्दल दिनेशने बीसीसीआयचे देखील आभार मानले आहेत.
महिन्याभरापूर्वी आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी लिलावकर्त्याची भूमिका ह्यू एडमीड्स यांनी बजावली होती. बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगसाठी मल्लिका सागरकडे ही जबाबदारी दिली होती.
मल्लिका सागरची यापूर्वीची कामगिरी
- यापूर्वी मल्लिकाने प्रो कबड्डी लीगमधील खेळाडूंचा लिलाव केलाय
- सेंटर फॉर मॉडर्न अँड कंटेम्पररी आर्ट, मुंबई येथेही त्या क्युरेटोरियल सल्लागार
- आर्ट इंडिया कन्सल्टंट्स फर्ममध्येही त्या भागीदार
- आयपीएल लिलावाचे जुने व्हिडिओ पाहून मल्लिकाने WPL लिलावाची तयारी केली.
भारताची उपकर्णधार स्मृतीला जवळपास साडेतीन कोटींचा करार लाभला. त्याचवेळी कर्णधार हरमनप्रीत कौरला मात्र स्मृतीच्या तुलनेत केवळ अर्धी रक्कम मिळाली आहे. मुंबई इंडियन्सने हरमनला स्वस्तात म्हणजेच १.८० कोटींमध्ये करारबद्ध केले. मुंबई संघातही हरमन सर्वाधिक रकमेची खेळाडू नाही, कारण मुंबईने सर्वाधिक रक्कम इंग्लंडची नॅत सायव्हर-ब्रन्ट हिच्यासाठी मोजली आहे. नॅतसाठी मुंबईने ३.२० कोटी खर्च केले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times