श्रेयस गेल्या काही दिवसांपासून बेंगळुरू येतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबसाठी होता. आता बीसीसीआयच्या मेडिकल टीमने श्रेयस फिट असल्याचे सांगितले असून तो आता दिल्लीत भारतीय संघात दाखल होणार आहे. श्रेयस संघात परतल्यामुळे भारतीय संघातील मधळ्या फळीची ताकद वाढली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शह यांनी श्रेयसच्या फिटनेसबद्दलची अपडेट दिली.
दुसऱ्या कसोटीच्या आधी गोलंदाजीत टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता, जेव्हा संघातील दोन स्टार गोलंदाजी दुखापतीमुळे बाहेर झाले होते. प्रसिद्ध कृष्णा आणि जयदेव उनाडकट हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. अर्थात भारतीय संघाकडे गोलंदाजांची चांगली फळी असल्याने या दोघांच्या दुखापतीचा फार परिणाम होणार नाही. दुसरी कसोटी दिल्लीत होणार आहे आणि या मैदानावर फिरकीपटूंना चांगली साथ मिळे असा अनुभव आहे.
श्रेयस अय्यरने भारताकडून आतापर्यंत ७ कसोटीतील १२ डावात ५६.७च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. १०५ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी या खेळाडूंमधून निवडला जाणार भारताचा अंतिम संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजार, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times