क्रिकेटर हार्दिक पांड्याने पत्नी नताशासोबतचे लग्नाचे फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय, ‘आम्ही तीन वर्षांपूर्वी घेतलेली शपथ पुन्हा एकदा व्हॅलेंटाईन डेला घेत हा दिवस साजरा केला. आमचं प्रेम, आमचा खास दिवस साजरा करण्यासाठी आमचे कुटुंबीय, मित्र आमच्यासोबत आहेत, याचा आनंद आहे’ अशा आशयाची खास पोस्ट त्याने लिहिली आहे.
दुसऱ्यांदा केलं लग्न
हार्दिकने २०२१ मध्ये नताशासोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर दोघांनी अतिशय साधेपणाने कोर्ट मॅरेज केलं होतं. हार्दिक-नताशाला अगस्त्य नावाचा मुलगा आहे. दोघांच्या या दुसऱ्या लग्नात नताशा आणि हार्दिक यांचा मुलगा अगस्त्यही सामिल झाला होता.
त्यांचं आता दुसऱ्यांदा लग्न झालं असून हा ग्रँड लग्नसोहळा उदयपूरमध्ये पार पडला. या दोघांनी ख्रिश्चन रितीनुसार लग्न केलं. हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल आणि वहिनी पंखुडीदेखील हे लग्न सेलिब्रेट करताना दिसले.
२०२० मध्ये नताशा आणि हार्दिकने अतिशय साधेपणाने, खासगीत लग्न केलं होतं. त्यावेळी केवळ कुटुंबीय या लग्नासाठी उपस्थित होते. मात्र आता करोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर या दोघांनी दुसऱ्यांदा ग्रँड वेडिंग करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
या दोघांची तीन ते चार वर्षांपूर्वी एका नाइट क्लबमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. काही वर्ष हे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर हार्दिकने २०२० मध्ये नताशाला प्रपोज केलं होतं. नंतर या दोघांच्या लग्नाची बातमी आली. त्यानंतर नताशाने एका बाळाला जन्म दिला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times