चेतन शर्माने झी न्यूजच्या कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल ही भाष्य केले आहे. यात चेतन शर्मा म्हणाले की, त्यांच्यात अहंकाराचा संघर्ष आहे पण एकमेकांशी कोणताही वाद किंवा मतभेद नाही. त्यांच्या मते विराट आणि रोहित हे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्यासारखे आहेत. दोन्ही सुपरस्टार आहेत. चेतन पुढे म्हणाले की या दोघांनी नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे आणि या सर्व मतभेदांच्या चर्चा मीडियामध्ये लावलेले तर्क आहेत.
ते म्हणाले की जेव्हा संघाशी संबंधित कोणतेही मोठे निर्णय घ्यावे लागायचे तेव्हा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात अहंकाराचा संघर्ष व्हायचा. विराट कोहली जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार होता, तेव्हा रोहित एकदिवसीय आणि टी-२० मध्ये उपकर्णधार म्हणून होता.
अहंकारामुळे मतभेद
मात्र, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यात कर्णधारपदावरून कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचे चेतन शर्माने स्पष्ट केले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही कठीण काळात एकमेकांना खूप साथ देतात, असे चेतन शर्मा म्हणाले. कर्णधारपदावरून दोघांमध्ये कोणतेही भांडण नव्हते. या सर्व मीडियाने पसरवलेल्या अफवा होत्या. त्यांच्यामध्ये केवळ अहंकारापायी मतभेद होते.
टी-२० विश्वचषकानंतर चेतन शर्मांची हकालपट्टी
टी-२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला ०१ विकेट्स राखून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर चेतन शर्मा यांना मुख्य निवडकर्ता पदावरून हटवण्यात आले. मात्र गेल्या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना पुन्हा एकदा हे पद देण्यात आले. चेतन शर्मा (५७) यांना डिसेंबर २०२० मध्ये टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times