दिल्ली: टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करत भारताने १-० अशी आघाडी मिळवली आहे. आता दुसरा कसोटी सामना १७ फेब्रुवारीला सुरु होणार असून या सामन्यासाठी भारताचा दमदार फलंदाज दुखापतीनंतर संघात परतला आहे. पहिली कसोटीसाठी पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला श्रेयस अय्यर फिट होत दिल्ली कसोटीसाठी टीम इंडियामध्ये परतला आहे. पण या दिल्ली कसोटीत तो खेळणार कि नाही याबद्दलची माहिती आता खुद्द राहुल द्रविड यांनीच दिली आहे.

भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर फिट झाला आहे. पाठीच्या समस्येमुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी संघाबाहेर ठेवण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही अय्यर खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. पण आता अय्यर तंदुरुस्त असून दुसऱ्या कसोटीसाठी संघात सामील झाला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होणार का? पाहूया काय म्हणाले प्रशिक्षक राहुल द्रविड.

रोहित मुलासारखा, हार्दिक सोफ्यावर झोपलेला असतो; चेतन शर्मांच्या स्टिंगमध्ये सनसनाटी दावे
राहुल द्रविड यांनी दिल्ली कसोटीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘दुखापतीतून पुनरागमन करणे नेहमीच चांगले असते. आम्हाला कोणीही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर राहील, हे नको आहे. एक संघ म्हणून हे आमच्यासाठी नक्कीच चांगले नसेल सोबतच खेळाडूंसाठीही ते चांगले नाही. श्रेयस संघात परत आला आहे आणि तो फिट आहे याचा मला आनंद आहे. काही दिवसांच्या प्रशिक्षणानंतर आम्ही निर्णय घेऊ. त्याचे आज एक मोठे सत्र होते, त्याने प्रशिक्षण घेतले आहे.’

द्रविड म्हणाले…

राहुल द्रविड पुढे म्हणाले की, उद्याही त्याचे मूल्यांकन केले जाईल. ते पुढे म्हणाले, ‘आम्ही उद्या देखील मूल्यांकन करू आणि कसे होते ते पाहू. जर तो फिट असेल आणि कसोटी सामन्याच्या पाच दिवसांसाठी तयार असेल, तर त्याच्या मागील कामगिरीमुळे तो थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये येईल यात शंका नाही.’

विराट विरुद्ध गांगुली अन् इंजेक्शन! चेतन शर्मांचे टीम इंडियाला धक्का देणारे ८ खळबळजनक दावे, वाचा सविस्तर
श्रेयस अय्यर हा फिरकीपटूंसमोर सर्वोत्तम फलंदाज आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत त्याने शतक झळकावले. बांगलादेशातील शेवटच्या कसोटी मालिकेतही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. दुस-या कसोटीच्या शेवटच्या डावात त्याने कठीण प्रसंगी नाबाद खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला.

सूर्याचा पत्ता होणार कट?

श्रेयस अय्यरचा अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात परतणार हणजे सूर्यकुमार यादवला अंतिम संघातून बाहेर पडावे लागेल. कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सूर्या आपल्या खेळीची चमक दाखवू शकला नाही. टी-२० फॉरमॅटमध्ये त्याचा रेकॉर्ड खूपच दमदार आहे पण वनडेनंतर आता कसोटी पदार्पणात त्याने आपल्या बॅटने छाप पाडली नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here