दिल्ली: आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीत सुरु झाला आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुक्रवारी मैदानात उतरताच चेतेश्वर पुजाराने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. १०० कसोटी सामने खेळणारा तो १३ वा भारतीय खेळाडू ठरला. पुजारा आता सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, कपिल देव, विराट कोहली यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे बीसीसीआयने सामना सुरु होण्यापूर्वी सेलिब्रेशनचे नियोजन केले. भारतीय क्रिकेटपटूची आपल्या देशासोबत १३ वर्षांची यशस्वी कारकीर्द आहे.

अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी चेतेश्वर पुजारासाठी एक खास कार्यक्रम ठेवण्यात आला. यावेळी सुनील गावस्कर यांनी पुजाराला खास कॅपही दिली. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगलोर कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पुजारा त्याच्या १०० व्या कसोटी सामन्यापूर्वी विशेष कॅप घेण्यासाठी तीन खास लोकांसह मैदानावर पोहोचला.
IND vs AUS 2nd test LIVE: शमीने मिळवून दिली भारताला पहिली विकेट, सलामीवीर झेलबाद

या खास प्रसंगी पुजारासोबत त्याचे पहिले प्रशिक्षक आणि वडील अरविंद पुजारा, त्याची पत्नी पूजा आणि मुलगीही उपस्थित होते. विशेष कॅप मिळाल्यानंतर पुजाराने गावस्कर यांचे आभार मानले आणि तुमच्याकडून ही कॅप मिळणे हा सन्मान असल्याचे सांगितले. आपल्या १०० व्या कसोटीवर पुजाराने त्याचे कुटुंब, चाहते, त्याची टीम आणि बीसीसीआयचे आभार मानले. त्याला टीम इंडियाकडून गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. पुजारा म्हणाला, “माझा विश्वास आहे की कसोटी क्रिकेट हा सर्वोत्तम फॉरमॅट आहे. ते तुमच्या स्वभावाची परीक्षा घेते, तुमच्या चारित्र्याची परीक्षा घेते.
काय म्हणाला पुजारा

सुनील गावसकर यांच्याकडून कॅप स्वीकारल्यावर पुजारा म्हणाला, “तुमच्याकडून ही कॅप स्वीकारणे हा सन्मान आहे, तुमच्यासारख्या दिग्गजांनी मला प्रेरणा दिली. मला लहानपणापासूनच भारताकडून खेळायचे होते, पण मी १०० कसोटी सामने खेळेन असे कधीच वाटले नव्हते. माझ्यासाठी कसोटी क्रिकेट हे अंतिम स्वरूप आहे, ते जीवनाप्रमाणेच तुम्हाला आव्हान देते. मी तुम्हा सर्व तरुणांना भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करतो. मी माझी पत्नी, माझे कुटुंब, बीसीसीआयमधील प्रत्येकाचे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला या प्रवासात साथ दिली.’

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here