आयसीसीच्या क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीगचा आज पहिला सामना संध्याकाळी साडे सहा वाजता सोनी सिक्स या वाहिनीवर पाहता येणार आहे. त्यामुळे आजपासून क्रिकेट चाहत्यांची चंगळ असल्याचे म्हटले जात आहे. आता ही सुपर लीग बरेच दिवस चालणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आता यापूर्वीसारखा क्रिकेटचा आनंग लुटता येणार आहे.
स्पर्धेची आखणी असेल तरी कशी…आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीतील पहिल्या सात संघांना विश्वचषकात थेट प्रवेश दिला जातो. भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या पात्रतेसाठी १३ संघ मैदानात उतरणार आहेत. यामध्ये तेरावा संघ हा नेदरलँड्सचा आहे. कारण त्यांनी २०१५-१७ या कालामधीमध्ये खेळवण्यात आलेल्या आयसीसीच्या सुपर लीग स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे त्यांना पात्रता स्पर्धेत सामील करण्यात आले आहे.
करोनाच्या काळात क्रिकेट जवळपास चार महिने ठप्प होते. पण त्यानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. ही मालिका इंग्लंडने २-१ अशा फरकाने जिंकली. आता आयसीसीची क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीग ही स्पर्धा आता ३० जुलैपासून सुरु होणार आहे.
आयसीसीची क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीग ही स्पर्धा भारतामध्ये २०२३ साली खेळवणाऱ्या विश्वचषकासाठी खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण १३ संघांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये तेरावा संघ हा नेदरलँड्सचा असणार आहे. या स्पर्धेत आता भारतीय संघ कधी दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
पहिली पात्रता स्पर्धा विश्वविजेता इंग्लंड आणि आयर्लंड या दोन देशांमध्ये होणार आहे. या दोन देशांतील मालिकेला ३० जुलैपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंडचा संघ कशी कामगिरी करतो. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. पण आयर्लंडचा संघ इंग्लंडला धक्का देणार का, याची उत्सुकताही चाहत्यांना आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Thank you ever so for you article post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.