गिलची दादागिरी
“आम्ही ओशिवरा पोलीस ठाण्याजवळ थांबल्यानंतर सुमारे २५ मिनिटे आमच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या कारमध्ये बसलेली गिल ही महिला बाहेर पडली. महिलेने माझ्याकडे येत ५० :हजार रुपयांची मागणी केली, ते न दिल्यास आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. पहाटे ४ च्या सुमारास गोंधळ ऐकून पोलीस बाहेर आले तेव्हा ती महिला, तिचा मित्र ठाकूर आणि तीन दुचाकींवरील सहा जण तेथून निघून गेले,” अशी माहिती ही शॉ चा मित्र यादव याने दिली.
पृथ्वी शॉने आक्षेप घेतला
यादव म्हणाला की, “ठाकूरने क्रिकेटपटू शॉसोबत दोनदा संपर्क साधला होता आणि त्याच्यासोबत सेल्फीही काढला. त्याने तिसर्यांदा सेल्फीसाठी विचारल्यावर शॉने आक्षेप घेतला, त्यानंतर ठाकूर आणि गिल यांना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटले. माझ्याशी आणि पृथ्वीशी गैरवर्तन केल्यावर त्या मुलाला आणि महिलेला कर्मचाऱ्यांनी हॉटेलमधून बाहेर काढले. आम्ही हॉटेलमधून बाहेर येईपर्यंत दोघांनी जवळपास २५ मिनिटे वाट पाहिली आणि नंतर त्यांनी काचा फोडण्यास सुरुवात केली,”
कारचा पाठलाग
“ती मुलगी गिल आणि तिचा मित्र ठाकूर बेसबॉलची बॅट घेऊन होते आणि त्यांनी शॉसोबत रस्त्यावर मारामारी सुरू केली. “हे सगळं थांबवण्यासाठी मी शॉला घटनास्थळावरून दुसर्या कारमध्ये जाण्यास सांगितले. सुरुवातीला आम्हाला वाटले की हे प्रकरण मिटले आहे. तथापि, शॉ कारमध्ये असल्याचे समजून आरोपी आणि त्यांचे सहा साथीदार आमच्या कारचा पाठलाग करत असल्याचे आमच्या लक्षात आले.” असे सांगताना यादव पुढे म्हणाला.
सकाळी ४ च्या सुमारास पहिल्यांदा ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर यादव यांनी पहिल्या वेळेस तक्रार दाखल केली नाही. ते पुन्हा हॉटेलमध्ये गेले आणि पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यापूर्वी दोन आरोपींबद्दल प्राथमिक तपशील गोळा केला. पोलिसांनी गिल, ठाकूर आणि सहा साथीदारांविरुद्ध दंगल, बेकायदेशीर जमाव, असभ्य वर्तन, खंडणी, हेतुपुरस्सर अपमान आणि गुन्हेगारी धमकी या कलमांखाली एफआयआर नोंदवला.
गिलच्या वकीलांचे ट्विट
गिलचे वकील अली काशिफ खान देशमुख यांनी ट्विट केले: “अंधेरी विमानतळावर बॅरल मॅन्शनबाहेर क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि त्याच्या गुंडांनी हल्ला केल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी इनफ्ल्यूएन्सर सपना गिलला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले आहे आणि तिने वैद्यकीय उपचार घेऊन ठीक होऊ नये आणि क्रिकेटपटूंविरुद्ध खटला दाखल करू नये यासाठी तिला सोडत नाही आहेत.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times