दिल्ली: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची दुसरी कसोटी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अर्ध्याहून अधिक संघ पॅव्हेलियनमध्ये पोहोचला आहे. यासामन्यात उस्मान ख्वाजाची विकेट घेत रवींद्र जडेजाने मोठी कामगिरी केली आहे. जडेजाने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये त्याने मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे.

जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीत २५०वी विकेट घेतली आहे. यानंतर २५० किंवा त्याहून अधिक विकेट घेणाऱ्या अनुभवी गोलंदाजांच्या यादीत तो आठवा गोलंदाज ठरला आहे. यासोबतच अनिल कुंबळे हे या यादीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज आहेत, त्याच्या आधी ६१९ विकेट्स आहेत. तसेच आर अश्विन ४५७, कपिल देव ४३४, हरभजन सिंग ४१७, इशांत शर्मा ३११, झहीर खान ३११, बिशन सिंग बेदी २६६ हे त्यांच्या खालोखाल आहेत.

IND vs AUS 2nd Test LIVE: ऑस्ट्रेलियाच्या २०० धावा पूर्ण, पाहुण्यांना ऑल आऊट करण्याच्या प्रयत्नात भारत
२५० हून अधिक विकेट घेणारे गोलंदाज
अनिल कुंबळे – ६१९
आर अश्विन – ४५७
कपिल देव – ४३४
हरभजन सिंग – ४१७
इशांत शर्मा – ३११
झहीर खान -३११
बिशन सिंग बेदी – २६६
रविंद्र जडेजा – २५०

IND vs AUS: ना बाऊन्सर, ना लाईन क्रॉस केली; तरीही मोहम्मद शमीचा चेंडू ठरला नो बॉल, नेमकं घडलं तरी काय

जडेजाने कपिल देव यांना मागे टाकले

भारतीय संघाचा दमदार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा पुनरागमनानंतर चांगल्याच फॉर्ममध्ये आहे आणि अनेक विक्रम मोडत आहे. त्याने पहिल्या सामन्यात विस्फोटक गोलंदाजी करत कांगारूंची चांगलीच झोप उडवली होती. तर या सामन्यातही त्याने महत्त्वाची विकेट घेत मोठी कामगिरी केली.

तिसऱ्यांदा सेल्फीसाठी भुणभुण, पृथ्वी शॉची सटकली; मित्राने सांगितली संपूर्ण घटना

जगातील दुसरा वेगवान खेळाडू

यासह जडेजा कसोटीत २५० बळी आणि २५०० धावा पूर्ण करणारा जगातील दुसरा आणि भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जडेजाने ७७ धावांची शानदार खेळी करत २५०० धावा पूर्ण केल्या होत्या. त्याच्या आधी इंग्लंडचा माजी कर्णधार इयान बॉथमने सर्वात कमी ५५ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. त्याच वेळी, भारतीय अष्टपैलू खेळाडूने ६१ कसोटींच्या ९० डावांमध्ये २५०० धावांचा पराक्रम पूर्ण केला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here