करोनापेक्षा मोठा व्हायरस हे भारताचे पंततप्रधान नरेंद्र मोदी आहे, अशी जहरी टीका आफ्रिदीने केली होती. त्यानंतर भारतीयांनी आफ्रिदीला चांगलेच धारेवर धरले होते. त्याचबरोबर भारत काश्मीरमधील लोकांवर अन्याय करत आहे आणि त्यांची एक टीम मी पाकिस्तानमध्ये खेळवणार आहे, असेही आफ्रिदी म्हणाला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने खेळवले जावेत, असे आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
आफ्रिदी हा भारतामध्ये बऱ्याचदा ट्रोल होत असतो. त्याच्याबाबतचे बरेच मीम्सही प्रसिद्ध आहेत. पाकिस्तानबरोबर सामना असला की बऱ्याच चाहत्यांना आफ्रिदीची आठवण आल्यावाचून राहत नाही. त्यामुळे आफ्रिदीला भारतीय चाहते कधीही विसरू शकत नाहीत, असे म्हटले जाते.
काही दिवसांपूर्वी आफ्रिदी हा समाजकार्यय करत होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आफ्रिदी हा आपल्या चाहत्यांबरोबर संवादही साधत असतो. एका चाहत्याने आफ्रिदीकडे त्याचा फोन नंबर मागितला होता आणि त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण आफ्रिदीने त्या चाहत्याच्या मागणीला योग्य प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले नाही. कारण आफ्रिदीने यावेळी आपला मोबाईल नंबर १२३४५६७८९१० असा दिल्याचे पाहायला मिळत आहे.
आफ्रिदीने वयाबाबत काय सांगितले ते पाहा…आफ्रिदीचे नेमके वय काय आहे, हे एक कोडे आहे. कारण बरीच वर्षे आफ्रिदीचे वय बदलले नव्हते, असे म्हटले जाते. एका चाहत्याने आफ्रिदीला त्याच्या वयाबाबत एक प्रश्न विचारला. या चाहत्याने विचारले की, ” आफ्रिदी तुझे नेमके वय तरी काय?” या प्रश्नावर आफ्रिदीने मजेशीर उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. आफ्रिदी या प्रश्नावर म्हणाला की, ” वय हा फक्त एक आकडा असतो, माझ्या मित्रा.”
आफ्रिदीने यावेळीही आपले वय लपवण्याचे टकाम चोख बजावल्याचे पाहायला मिळत आहे. पण आफ्रिदीला वय लपवण्याची गरज तरी काय, असा सवाल चाहते विचारत आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
A big thank you for your article.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.