कोणत्या गटात कोणते संघ?
स्पर्धेतील १० संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, केकेआर, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स तर ग्रुप बी मध्ये चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात टायटन्स हे संघ आहेत.
फायनल मॅच कधी?
आयपीएलच्या नव्या हंगामातील फायनल मॅच २८ मे रोजी खेळवली जाणार आहे. २१ मे रोजी साखळी फेरीतील लढती संपतील. तर २३ मे पासून प्लेऑफच्या लढती होणार आहेत. अंतिम मॅच गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार असल्याचे कळते, मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच प्लेऑफच्या लढती कुठे होतील हे नंतर जाहीर केले जाणार आहे.
कोणत्या मैदानावर होणार लढती
आयपीएल २०२३च्या हंगामातील लढती देशातील १२ मैदानांवर होणार आहे. यात अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाळा यांचा समावेश आहे. जयपूरसह गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्स संघाचे होम ग्राउंड असेल. तर मोहाली आणि धर्मशाळा हे पंजाब किंग्जचे होम ग्राउंड असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times