जडेजाने घेतलेल्या विकेट्स
लाबुशेनला क्लीन बोल्ड करत जडेजाने विकेट्सचा सिलसिला सुरु केला आणि मग त्यांनी एकापाठोपाठ एक ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. लाबुशेननंतर जडेजाने २ विकेट मेडेन ओव्हर टाकली, ज्यात त्याने पहिल्या चेंडूवर रेनेशॉला LBW आऊट केले तर हॅंड्सकोम्बला विराट कोहलीकरवी खाते उघडू ने देता झेलबाद केले. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असलेला पॅट कमिन्सला बेल्स उडवत भन्नाट क्लीन बोल्ड केले. तर नंतर कॅरी, नॅथन लायन आणि कुहेनमनला क्लीन बोल्ड करत ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट केले.
जडेजाची दमदार गोलंदाजी
रवींद्र जडेजाने बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त १२.१ षटकात ७ विकेट्स घेतल्या. यापूर्वी हा विक्रम आर अश्विनच्या नावावर होता, ज्याने २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १३.५ षटकात ७ किंवा त्याहून अधिक बळी घेतले होते. तर नरेंद्र हिरवाणीने १५.२ षटकांत ही कामगिरी केली. इरफान पठाणनेही तितक्याच षटकांत ही कामगिरी केली आहे.
त्याचवेळी डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने १२.१ षटकात ४२ धावा देत ७ विकेट्स घेतले. रवींद्र जडेजाची ही कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी आहे, कारण यापूर्वी त्याने २०१६ मध्ये चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ४८ धावांत ७ विकेट घेतले होते. विशेष म्हणजे रवींद्र जडेजाची ही कसोटी क्रिकेटमधली दुसरी ७ विकेटची स्पेल आहे, जी खूप वेगवान होती. एकदा तो हॅट्ट्रिकच्या अगदी जवळ होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times