दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामनाही भारताने आपल्या नावे केला आहे. टीम इंडियाने ६ विकेट्सने कांगारू संघाचा पराभव केला. १०५ धावांच्या लक्ष्याला उत्तर देताना कर्णधार रोहित शर्माने भारताला चांगली सुरुवात करून दिली. कोणत्याही फलंदाजाला धावबाद होऊन विकेट गमावायची नसते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्माने पुजारासाठी आपली विकेट गमावली. केएल राहुल पुन्हा अपयशी ठरला तरी हिटमॅनची आक्रमक फलंदाजी सुरूच होती. पहिल्या चेंडूपासूनच रोहित शर्मा खूप आत्मविश्वासू दिसत होता.

भारताच्या दुसऱ्या डावातील ७व्या षटकात मॅथ्यू कुहेनमन गोलंदाजी करत असताना ही घटना घडली. चेंडूला ऑन-साईड पुश केल्यानंतर रोहित शर्माने पहिली धाव घेतली, नंतर दुसरी धाव घेण्यासाठी तो मागे वळला पण पुन्हा मध्येच थांबला. दोन्ही फलंदाज गोंधळात पडले, पण कॉल रोहितचा असल्याने त्याने आपली विकेट सोडली आणि निराश होत मैदान सोडले. बाद होण्यापूर्वी टर्निंग ट्रॅकवर त्याने २० चेंडूत ३१ धावा केल्या.

IND vs AUS: भारताने दिल्ली जिंकली, तिसऱ्याच दिवशी सामना संपवला! दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय
रोहित शर्मा निराश होऊन परतला

दुसरी धाव घेत असताना रोहित शर्मा मधल्या क्रीजवर तसाच उभा राहिला आणि धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहित शर्मा परत क्रीझवर पोहोचेपर्यंत क्षेत्ररक्षकाने चेंडू यष्टिरक्षक कॅरीच्या हातात टाकला होता, त्यामुळे यष्टीरक्षकाने धावबाद केला आणि रोहित खूपच दूर होता. बाद झाल्यानंतर रोहित निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. पण पुजाराने रोहितचे बलिदान वाया जाऊ दिले नाही. त्याने भारतासाठी विजयी चौकार लगावत भारताला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.


IND vs AUS: जडेजाच्या फिरकीसमोर कसोटी सामना झाला टी-२० सारखा, १२ ओव्हरमध्ये घेतल्या ७ विकेट्स; पाहा VIDEO

आता चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर १ मार्चपासून खेळवला जाईल, जो आधी धर्मशाला येथे होणार होता. भारतीय संघाने इंदूरचा किल्लाही जिंकल्यास बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवरील आपली पकड कायम राहील. लंडनमधील ओव्हल येथे ८ जून रोजी होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. तर भारताने या विजयासह क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल क्रमांक पटकावत इतिहास रचला आहे. भारत आता कसोटीच्या आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here