ऑस्ट्रेलिया सध्या ६६.६७ टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहे तर भारत आता ६४.०६ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे सध्या ५३.३३ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेला टॉप-२ मध्ये जर जागा मिळवायची असेल तर त्यांच्या आगामी दोन्ही कसोटी जिंकणे त्यांना अनिवार्य असेल. पण भारताचे अजून दोन कसोटी सामने बाकी आहेत आणि आपले स्थान या फेरीत टीम इंडियाला कायम ठेवायचे असेल तर त्यांना इंदूर कसोटी जिंकावी लागेल. जर भारताने होळकर स्टेडियमवर विजय मिळवला तर ते जूनमध्ये ओव्हल येथे होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीतून बाहेर पडू शकणार?
सध्याच्या घडीला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वात मजबूत संघ ऑस्ट्रेलियाचा आहे. पण त्यांचं अंतिम फेरीचं तिकीट निश्चित झालं आहे, असं म्हणता येणार नाही. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत २-० अशी आघाडी मिळवली आहे, भारताने जर ही मालिका ४-० अशा फरकाने जिंकली तर ऑस्ट्रेलियावर मोठं संकट नक्कीच येऊ शकतं. कारण गुणतालिकेत त्यांचे पॉईंट्स कमी होत ते खाली घसरू शकतात आणि त्यांना अंतिम फेरीत जागा निश्चित करण्यासाठी श्रीलंका-न्यूझीलंड मधील कसोटी मालिकेवर अवलंबून राहावे लागेल. श्रीलंकेने जर ही कसोटी एकतर्फी जिंकली तर ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीच्या रेसमधून बाहेर जाईल. तर सोबतच अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेत होईल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टॉप-५
ऑस्ट्रेलिया – ६६.६७%
भारत – ६४.०६%
श्रीलंका – ५५.३३%
दक्षिण आफ्रिका – ४८.७२%
इंग्लंड -४६.९७%
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times