नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे आणि दोन्ही संघात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या दोन लढती जिंकून भारताने ट्रॉफी स्वत:कडे ठेवली आहे. नागपूर येतील पहिली कसोटीत १ डावा आणि १३२ धावांनी जिंकल्यानंतर भारताने दुसरी कसोटी ६ विकेटनी जिंकली होती. या दोन्ही सामन्यात अनेक खास विक्रम देखील झाले. दिल्ली कसोटीचा हिरो ठरला तो रविंद्र जडेजा होय.

भारताचा हा स्टार ऑलराउंडरला इस्टाग्रामवर ५ मिलियन फॉलोअर्स आहेत. पण जडेजा कोणालाही फॉलो करत नाही. रविवारी दिल्ली कसोटीत विजय मिळवल्यानंतर मात्र जडेजाने एका व्यक्तीला फॉलो करण्यास सुरूवात केली.

जडेजाने रविवारी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लियोनला फॉलो करण्यास सुरुवात केली. पण जडेजाने हे देकील स्पष्ट केले की तो लियोनला फक्त २४ तासांसाठी फॉलो करणार आहे. जडेजाने हसणाऱ्या इमोजीसह इस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात तो म्हणतो की, २४ तासासाठी मी मित्र नाथन लियोन फॉलो करत आहे. यासह जडेजाने स्क्रीन शॉट देखील शेअर केला. ज्यात तो ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूला फॉलो करताना दिसतोय.

IPL चॅम्पियन संघाला मोठा झटका; हंगाम सुरू होण्यापूर्वी १ कोटी पाण्यात, मॅच जिंकून देणारा…
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटीत जडेजा-अश्विन जोडीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसोबत ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अखेरच्या दोन कसोटीसाठी संघात मोठा बदल झालेला नाही. फलंदाजीत खराब कामगिरी करणाऱ्या केएल राहुलचे स्थान कायम ठेवण्यात आले आहे. मात्र त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आलय.

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

पहिली कसोटी- भारताचा १ डाव आणि १३२ धावांनी विजय
दुसरी कसोटी- भारताचा ६ विकेटनी विजय
तिसरी कसोटी- ०१ ते ०५ मार्च, इंदूर
चौथी कसोटी- ०९ ते १३ मार्च, अहमदाबाद

वनडे मालिका
पहिली वनडे- १७ मार्च, मुंबई
दुसरी वनडे- १९ मार्च, विशाखापट्टणम
तिसरी वनडे- २२ मार्च, चेन्नई

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here