मात्र, स्मृतीने तिच्या खेळीदरम्यान अनेक विक्रम रचले. स्मृती मानधना ही दक्षिण आफ्रिकेतील महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज ठरली आहे. मानधनाने माजी कर्णधार मिताली राजचा विक्रम मोडीत काढला. मिताली राजने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद ७६ धावा केल्या होत्या.
स्मृतीने आयर्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपले २२ वे अर्धशतक झळकावले. ती भारतातील पहिली आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारी जगातील दुसरी महिला फलंदाज ठरली. महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम न्यूझीलंडच्या सुझी बेट्सच्या नावावर आहे, जिने २६ अर्धशतके केली आहेत.
मानधना चालू टी-२० विश्वचषकात बॅक टू बॅक अर्धशतकी खेळी केल्या. महिला टी-२० विश्वचषकाच्या एका सीझनमध्ये दोन अर्धशतके झळकावणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली. या प्रकरणात स्मृती मानधनाने माजी कर्णधार मिताली राजची बरोबरी केली आहे. मिताली राजने महिला टी-२० विश्वचषकाच्या दोन सीझनमध्येमध्ये दोन अर्धशतके झळकावली आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times