नवी दिल्ली: आयपीएल २०२३चे वेळापत्रक काहीच दिवसांपूर्वी बीसीसीआयने जाहीर केले. जगातील या सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत लीगमध्ये खेळण्याची इच्छा प्रत्येक खेळाडूची असते. मात्र पाकिस्तान खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. यावरून पाकिस्तानचे माजी खेळाडू प्रत्येक दिवशी काही ना काही बरळत असतात. यावेळी देखील पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूने भारतीय संघावर सोशल मीडियावरून आक्षेपार्ह वक्तव्य केले.

भारतीय संघावर करण्यात आलेल्या या वक्तव्यानंतर भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनिल गावस्कर यांनी पाक खेळाडूंचा समाचार घेतला. आयपीएलमध्ये खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचा राग कुठे ना कुठे बाहेर येतोय.

पाकिस्तानचे माजी खेळाडू रमीझ राजा आणि शोएब अख्तर हे सोशल मीडियावरून भारताची बदनामी करण्याची किंवा टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूंचे वक्तव्य ऐकल्यानंतर सुनिल गावस्कर प्रचंड संतापले. पाक खेळाडूंच्या या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, पाकिस्तानचे खेळाडू हे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतता. भारताने या क्रिकेटपटूंच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये. खास करून सोशल मीडियाला माझी विनंती आहे की, या पाकच्या क्रिकेटपटूंच्या वक्त्यांकडे दुर्लक्ष करावे. हे माजी खेळाडू फॉलोअर्स मिळवण्यासाठी करत आहेत. त्यांना प्रसिद्धी झोतात रहायचे आहे.

एकच इच्छा, पाकिस्तानने दणदणीत विजय मिळवावा; टीम इंडियाची वर्ल्डकप जिंकण्याचे समीकरण…
‘खेळाडूंमध्ये नेहमीच वाद सुरू असतात. पण राग आणि अश्लील वक्तव्ये करणे या गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत. आज जर अशा काही गोष्टी होत असतील तर त्या अशा खेळाडूंच्या मध्ये होतात जे आयपीएलमध्ये खेळत नाहीत. त्यामुळेच जेव्हा ते लोक भारताविरुद्ध बोलतात तेव्हा भारतीय खेळाडूंबद्दल त्यांचा राग दिसून येतो. यातील काही खेळाडूंना असे वाटते की त्यांनी करिअरमध्ये इतकी मोठी कामगिरी केली आहे की त्यांना भारतीय खेळाडूंपेक्षा अधिक पैसे मिळाले पाहिजेत’, असे गावस्कर म्हणाले.

यापुढे जाऊन गावस्कर म्हणाले, तुम्ही कधी कोणत्याही भारतीय खेळाडूला सीमेपलीकडच्या खेळाडूबद्दल असं बोलताना ऐकले आहे का? अशा प्रकारच्या गोष्टींकडे कोणाचेही लक्ष जात नाही. कारण आपले खेळाडू कधीच असं करत नाहीत. ही आपली पद्धत नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here