मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा सीझन ३१ मार्चपासून सुरू होत आहे. यावेळी स्पर्धेचे डिजिटल हक्क हॉटस्टारऐवजी जिओ सिनेमाकडे देण्यात आले आहेत. आयपीएल अनुभव चाहत्यांसाठी अधिक मनोरंजक बनवण्यासाठी जिओ सिनेमाने स्ट्रीमिंगमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्य समाविष्ट केली आहेत. या नव्या वैशिष्ट्यांसह यंदाची आयपीएल आपल्याला पाहायला मिळणार आहे.

या टूर्नामेंट १२ वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असेल, युझर्स ३६० अँगलने सामने पाहणायचा आनंद घेऊ शकणार आहेत. एवढेच नाही तर सामना पाहण्यासाठी त्यांना त्यांच्या पसंतीचा अँगलही निवडता येईल. याचसोबत या नव्या सुविधा आपल्याला मोफत पाहायला मिळणार आहेत. यावेळेस चाहते इंटरनेट आणि टीव्हीवर सामने कधी कुठे कसे पाहू शकतील, त्यांना दोन्ही माध्यमांवर कोणते फायदे मिळतील, हे जाणून घेऊया.

तुफानी खेळीनंतरही शतक हुकलं, स्मृती मानधनाची ८७ धावसंख्या ठरली ‘अनलकी’?
डिजीटलचे हक्क जिओकडे , टीव्हीचे हक्क स्टारकडे

Jio ने आयपीएलचे डिजिटल मीडिया अधिकार २०,५०० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. त्याचवेळी स्टारने २३,५७५ कोटी रुपयांना टीव्हीचे हक्क विकत घेतले. भारताबाहेर मीडिया हक्कांच्या विक्रीनंतर, बीसीसीआयने ५ वर्षांसाठी एकूण ४८,३९० कोटी रुपयांना आयपीएलचे हक्क विकले. म्हणजेच एका सामन्यासाठी बीसीसीआयला जवळपास ३ कोटी रुपये मिळतील. टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स 1 आणि 3 वर सामना पाहू शकतील. त्याच वेळी, तुम्ही संपूर्ण टूर्नामेंट जिओ सिनेमावर पाहू शकाल.

संपूर्ण टूर्नामेंट इंटरनेटवर फ्री

बीसीसीआयने यावेळी जिओ सिनेमाला आयपीएल मोफत दाखवण्याची परवानगी दिली आहे. या टूर्नामेंटमधील सर्व ७४ सामने जिओ सिनेमावर फ्रीमध्ये पाहता येणार आहेत. यापूर्वी, युझर्सना हॉटस्टारवर सामने पाहण्यासाठी प्रीमियम योजना खरेदी करावी लागत होती. 4K म्हणजेच अल्ट्रा एच डी गुणवत्तेत सामना पाहण्यासाठी युझर्सना वेगळा खर्च करावा लागणार नाही.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने हार मानली? दोन सामने हरताच कर्णधार परतला मायदेशी, नेमकं कारण काय
आवडत्या अँगलने फ्रीमध्ये दिसणार आयपीएल

सामना पाहण्यासाठी युझर्स त्यांना हवा तो अँगल निवडण्यास सक्षम असतील.३६० डिग्री अँगलने सामना पाहण्यासाठी जिओ २ विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण लॉन्च करण्याचा विचार करत आहे. एक जिओ डाईव्ह (Jio Dive) असेल आणि दुसरा जिओ क्लास (Jio Glass) असेल.

जिओ डायव्ह ब्लूटूथ हेडफोन्स असतील, ज्यामध्ये युझर्स स्पष्ट आणि उच्च दर्जाची साऊंड क्वालिटी असेल तर, जिओ ग्लासेस ३-डी ग्लासेससारखे असतील, युझर्स या ग्लासेसच्या मदतीने सर्व अँगल्सने हाय क्वालिटी स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतील.

१२ वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध

भारतातील क्रिकेट सामने सहसा हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये दाखवले जातात. पण, यावेळचा आयपीएल सीझन जवळपास १२ भाषांमध्ये पाहता येणार आहे. या भाषांमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, भोजपुरी, उडिया, तेलगू, तामिळ आणि कन्नड यांचाही समावेश आहे.
मोठी बातमी! WTC फायनलमधून हा संघ पडला बाहेर, भारतासमोर बलाढ्य संघांचे आव्हान
मीडिया केबल देखील लॉन्च करणार

Jio Dive आणि Jio Glass सोबत मीडिया केबल्स देखील लाँच करण्याची योजना आखण्यात आली आहे. या केबलच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल कोणत्याही जुन्या टीव्हीला जोडून तो स्मार्ट टीव्ही बनवू शकाल. याद्वारे तुम्ही इंटरनेटच्या मदतीने फक्त टीव्हीवर सामना पाहू शकाल. यासाठी तुम्हाला स्टार स्पोर्ट्स चॅनलचे सबस्क्रिप्शनही घ्यावे लागणार नाही.

आयपीएलच वेळापत्रक

ही लीग २०१९ नंतर प्रथमच भारतात होम आणि अवे फॉरमॅटमध्ये परत आली आहे. तीन वर्षांनंतर चाहत्यांना त्यांचा आवडता संघ घरच्या मैदानावर खेळताना दिसेल. लीग टप्प्यातील शेवटचा सामना २१ मे रोजी तर अंतिम सामना २८ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. आयपीएलचा पहिला चॅम्पियन असलेल्या राजस्थान रॉयल्सला यावेळी दोन होम ग्राउंड्स असतीलयंदा गुवाहाटी प्रथमच इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चे सामने आयोजित करणार आहे. राजस्थान रॉयल्सचे हे दुसरे होम ग्राउंड असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here