प्रभसिमरनने फक्त ५५ चेंडूत १७ षटकार आणि ९ चौकारांसह १६१ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर कॅगच्या संघाने ६ बाद २६७ धावांचा डोंगर उभा केला.
सामन्यात कॅगने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रभसिमरन आणि रामसिंह संजय यांनी डावाची सुरूवात केली. एका बाजूने विकेट पडत असताना प्रभसिमरन मात्र षटकार, चौकारांचा पाऊस पाडत होता. त्याने ५५ चेंडूत १६१ धावा केल्या. त्याला धनैत राऊतने बाद केले. प्रभसिमरनने २९२.७३च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. कॅगकडून संजयने ३५, अंकित कौशिकने २० धावांचे योगदान दिले.
उत्तरादाखल इनकम टॅक्स संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ओमकार जाधव शून्यावर बाद झाला. हिमांशु जोशीने अर्थशतक केले, मात्र त्याला अन्य कोणत्याही फलंदाजाचा साथ मिळाली नाही. २० षटकात त्यांना ९ बाद १५२ धावा करता आल्या आणि ही लढत कॅगने ११५ धावांनी जिंकली. कॅगकडून मनु कृष्णनने २५ धावात ४ तर जे सुचितने २२ धावा ३ विकेट घेतल्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times