नवी दिल्ली: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने सध्या भारतात खेळवले जात आहेत. या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २ कसोटी सामने जिंकत २-० अशी आघाडी मिळवली आहे. पण या कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू वैयक्तिक कारण तर काही दुखापतीच्या कारणाने मायदेशी परतले आहेत. याच दरम्यान आता ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. या संघात ऑस्ट्रेलियाच्या मायदेशी परतलेल्या आणि दुखापत झालेल्या खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे.

१७ मार्चपासून सुरू होणाऱ्या या वनडे मालिकेत पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करेल. ऑस्ट्रेलियाच्या १६ सदस्यीय संघात अनेक स्टार खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. यामध्ये अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन आणि मिचेल मार्श यांच्या नावाचा समावेश आहे. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जोस हेजलवूडला दुखापतीमुळे वनडे संघातून देखील बाहेर राहावे लागणार आहे.

दुसऱ्यांदा धुलाईसाठी तयारीत राहा ऑस्ट्रेलिया! कसोटीनंतर वर्ल्डकपमध्ये भारताच्या आशा वाढल्या
पॅट कमिन्स या तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे, तर अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन हे देखील सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांच्या मते, या वर्षाच्या शेवटी भारतात होणाऱ्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका सराव म्हणून असेल.

“विश्वचषक अवघ्या सात महिन्यांवर असताना, भारतातील हे सामने आमच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहेत. ग्लेन, मिशेल आणि झाय हे सर्व प्रमुख खेळाडू आहेत, जे आम्हाला वाटते की संघ ऑक्टोबरमध्ये येऊ शकतात,” असे बेली म्हणाले.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १७ मार्च रोजी मुंबईत आहे, उर्वरित दोन सामने वायझॅग (१९ मार्च) आणि चेन्नई (२२ मार्च) येथे होतील.

पृथ्वी शॉ प्रकरणावर सपना गिलचा गंभीर आरोप, म्हणाली- त्याने मला नको तिथे स्पर्श केला
ऑस्ट्रेलिया वनडे संघ:

पॅट कमिन्स (क), शॉन ॲबॉट, ॲश्टन आगर, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here