हरमनप्रीत कौरने महिला टी-२० विश्वचषकाच्या गट टप्प्यात तिच्या बॅटने फारशी चांगली कामगिरी करताना दिसली नाही. तिने ४ सामन्यात केवळ ६६ धावा केल्या. पण तिच्या नेतृत्वाखाली संघाने ४ पैकी ३ सामने जिंकले. याशिवाय हरमनप्रीत कौरला आयसीसी नॉकआऊट सामन्यांमध्येही खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. अशा स्थितीत ती न खेळल्यास उपांत्य फेरीत भारतासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.
पूजा न खेळल्याने टीम कॉम्बिनेशनवर परिणाम
पूजा वस्त्राकर ही संघाची अनुभवी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे आणि गट टप्प्यातील सर्व सामन्यांमध्ये ती खेळताना दिसली आहे. तिने महिला टी-२० विश्वचषकातील ४ सामन्यात २ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय ती बॅटने मधल्या फळीतही चांगली भूमिका निभावते. पूजा आजच्या सामन्यात न खेळल्याने संघाच्या चांगल्या संयोजनात फरक पडू शकतो.
हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर आजारपणामुळे खेळू शकत नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्या दोघी कितपत निरोगी आहेत याचे चित्र सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत या दोघीही खेळलय नाहीत तर उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यात भारतासमोर कर्णधारपदाचा प्रश्न तर निर्माण होईलच, पण दोन महत्त्वाच्या खेळाडूंचाही प्रश्न निर्माण होईल. ते न खेळल्यास भारतीय संघ व्यवस्थापन कोणाला मैदानात उतरवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times