नवी दिल्ली: महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच धावांनी भरता पराभव पत्करावा लागला आहे. या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर अत्यंत भावूक झाली. ती तिची सिनियर पार्टनर आणि माजी कर्णधार अंजुम चोप्राला मिठी मारून रडताना दिसली. मॅचनंतर जेव्हा ती प्रेझेंटेशनसाठी आली तेव्हा तिने सनग्लासेस लावले होते. याबाबत विचारले असता तिने असे उत्तर दिले, जे ऐकून देशातील प्रत्येकजण भावूक होईल.

भारताची धाकड कर्णधार हरमनप्रीत म्हणाली- माझ्या देशाने मला रडताना पाहावे असे मला वाटत नाही. म्हणूनच मी हा चष्मा घातला आहे. मी वचन देते की, आम्ही सुधारू आणि देशाची मान पुन्हा अशी खाली जाऊ देणार नाही. जेव्हा तिला अश्रू का असा प्रश्न विचारला तेव्हा कर्णधाराने उत्तर दिले – ज्या प्रकारे मी धावबाद झाले. यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत खेळलो याने खुश आहोत. आम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचे होते.

VIDEO:अंजुम चोप्राला भेटून ढसाढसा रडली हरमनप्रीत कौर, पराभवाने हिरमुसली टीम इंडियाची कॅप्टन
हरमनने या विचित्र रनआउटसाठी आपल्या नशिबालाला दोष दिला, ज्यामुळे आणखी एक हृदयद्रावक पराभव भारतीय संघाला पाहावा लागला. ती म्हणाली – यापेक्षा जास्त निराशजनक काही होऊ शकत नाही. जेमी (रॉड्रिग्ज) सोबत सामन्यात आमचा दबदबा तयार केला होता. आम्हाला विजयाची अपेक्षा होती, पण धावबाद झाल्यानंतर सर्व काही बदलले. ही गोष्ट खूप काळापर्यंत वेदना देत राहील.

INDW vs AUSW: सेमीफायनल आणि रनआऊट… हरमनसोबत झाली धोनीच्या बॅड लकची पुनरावृत्ती, पाहा VIDEO
पुढे ती म्हणाली- ‘आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. आज आम्हाला आमचा नैसर्गिक खेळ खेळायचा होता. आपल्यापैकी काहींनी हे केले. खराब क्षेत्ररक्षणावर ती म्हणाली – आम्ही पुन्हा एकदा काही सोपे झेल घेतले. जेव्हा तुम्हाला जिंकायचे असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या संधी घ्याव्या लागतील. या (चुकांमधून) आपण फक्त शिकू शकतो. याआधी गेल्या विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाने भारताचा अंतिम फेरीत पराभव केला होता. कॉमनवेल्थ गेम्समध्येही असेच काहीसे घडले होते.’

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here