नवी दिल्ली: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलिया संघाला एका पाठोपाठ एक अनेक धक्के बसले आहेत. मालिकेतील पहिल्या दोन लढती गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघातील अनेक खेळाडू दौऱ्यातून माघारी परतले आहेत. यात कर्णधार पॅट कमिन्सचा देखील समावेश आहे. कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथकडे नेतृत्व देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. दोन्ही संघातील तिसरी कसोटी एक मार्चपासून इंदूर येथे होणार आहे.

चार सामन्यांच्या मालिकेतील २ लढती जिंकून भारताने ट्रॉफी स्वत:कडे ठेवली आहे. कारण गेल्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. तिसऱ्या कसोटीच्या आधी ऑस्ट्रेलिया संघातील ६ खेळाडू मायदेशात परतले आहेत. यात डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे तर ग्लेन मॅक्सवेल देखील दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.

संघ अडचणीत असताना पॅट कमिन्स मायदेशात जाण्यावरून बरीच चर्चा सुरू होती. कमिन्स वैयक्तीक कारणामुळे मायदेशात जाणार असल्याचे म्हटले गेले होते. आता कमिन्स नेमक का घरी जातोय याचे कारण समोर आले आहे. पॅट कमिन्सच्या आईची प्रकृती बिघडली आहे आणि तिची काळजी घेण्यासाठीच त्याने भारताचा दौरा अर्धवट सोडून घरी जाण्याचा निर्णय घेतलाय. देश आणि जन्म देणाऱ्या आई यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा कमिन्सने आईला प्रधान्य दिले. त्याने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वजण कौतुक करत आहेत.

कसोटी क्रिकेटमधील अफलातून कॅचनंतर टिम साऊदीने इतिहास घडवला; पहिलाच गोलंदाज ज्याने…
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत झालेल्या पहिल्या दोन सामन्यात कमिन्सला फार चांगली कामगिरी करता आले नव्हती. २ सामन्यात त्याला फक्त ३ विकेट घेता आल्या होत्या. आता मालिकेतील उर्वरीत सामन्यात कमिन्सच्या जागी मिचेल स्टार्क हा गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करू शकतो. स्टार्कने सप्टेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर अखेरची कसोटी खेळली होती, त्यानंतर दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. स्टार्कसोबत ऑलराउंडर कॅमरून ग्रीन देखील फिट असल्याचे समजेत, तो देखील इंदूर कसोटीत अंतिम ११ मध्ये दिसण्याची शक्यता आहे.

Video: मोठा अपघात टळला, विमानतळावर आणीबाणी; एअर इंडियाच्या विमानाचे थरारक इमर्जन्सी लँडिंग
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

पहिली कसोटी- भारताचा १ डाव १३२ धावांनी विजय
दुसरी कसोटी- भारताचा ६ विकेटनी विजय
तिसरी कसोटी- इंदूर येते ०१ ते ०५ मार्च
चौथी कसोटी- अहमदाबाद येथे ०९ ते १३ मार्च

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here