विजयासाठी ३५८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या लिथगोचा डाव २२८ धावा संपुष्ठात आला. ब्रॅडमनच्या संघाने १२९ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात ब्रॅडमन यांनी जितक्या धावा केल्या होत्या तेवढी धावसंख्या लिथगो इलेव्हनच्या ११ फलंदाजांना मिळून काढता आली नाही. ब्रॅडमन यांनी १४ षटकार आणि २९ चौकार मारले होते.
या लढतीत मॅचच्या सुरुवातीच्या ३ ओव्हरमध्ये ब्रॅडमन यांनी शतक पूर्ण केले होते. अर्थात तेव्हा आजच्या सारख्या एका ओव्हरमध्ये ६ चेंडू नव्हेत तर ८ चेंडूची एक ओव्हर असायची. ब्रॅडमन यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये ३३ धावा लुटल्या, यात ३ षटकार आणि ३ चौकार होते. तर दोन आणि एका सिंगलचा समावेश होता.
दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी ४० धावांचा पाऊस पाडला. यात ब्रॅडमन यांनी एकही धाव पळून काढली नाही. यात ४ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी २७ धावा केल्या आणि अशा प्रकारे २२ चेंडूत शतक पूर्ण केले.
सरासरी ९९.९४
ब्रॅडमन हे त्यांच्या वादळी फलंदाजीसाठी ओळखले जात. ते जगातील एकमेव असे फलंदाज आहेत ज्यांची कसोटीमधील सरासरी ९९.९४ इतकी आहे. आजवर या सरासरीच्या जवळ देखील कोणाला पोहोचता आले नाही. ब्रॅडमन यांनी ऑस्ट्रेलियाकडून ५२ कसोटी मॅचमध्ये ६ हजार ९९६ धावा केल्या. यात २९ शतक, १२ द्विशतक आणि १३ अर्थशतकांचा समावेश आहे. ३३४ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times