नवी दिल्ली: कसोटी क्रिकेटचा इतिहास १४० वर्षांचा आहे. क्रिकेटमधील या मुळ खेळाचे महत्त्व आज वनडे आणि टी-२० प्रकारामुळे जरा ही कमी झाले नाही. कसोटीमध्ये एकापेक्षा एक फलंदाज आणि गोलंदाज झाले आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त दोन वेळा असे झाले आहे की, एखाद्या गोलंदाजाने संपूर्ण संघाला बाद केले.

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात प्रतिस्पर्धी संघाच्या सर्व फलंदाजांना बाद करण्याची घटना सर्व प्रथम घडली होती ती १९५६ साली आणि दुसऱ्यांचा हा कमाल झाला होता १९९९ साली.

वाचा-

क्रिकेटमध्ये एका डावात पहिल्यांदा दहा विकेट घेण्याची कमाल ३१ जुलै १९५६ रोजी झाली होती. आजपासून ६४ वर्षांपूर्वी एका विश्व विक्रमाची नोंद झाली होती. जो अद्याप कायम देखील आहे. १९५६ नंतर क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज गोलंदाज आले आणि गेले पण कोणालाही हा विक्रम मोडता आला नाही.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९५६ साली पाच सामन्यांची अॅशेस मालिका सुरू होती. या मालिकेआधी इंग्लंडने सलग दोन अॅशेस मालिका हरल्या होत्या. त्यामुळे यावेळी यजमान इंग्लंड अॅशस ट्रॉपी वाचवण्यासाठी खेळत होता.

वाचा-
पाच सामन्यातील पहिला सामना ड्रॉ झाला होता. पण दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. तिसरा सामना जिंकत इंग्लंडने १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर चौथ्या सामना २६ ते ३१ जुलै दरम्यान झाला. तेव्हा कसोटी सामन्यात एक दिवसाचा ब्रेक घेतला जात असल्यामुळे सामना ६ दिवस चालत असे.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात ४५९ धावा केल्या. उत्तरा दाखल ऑस्ट्रेलियाने चांगली सुरूवात केली. पण त्यानंतर जिम लेकरने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना गुडघे टेकायला लावले. ऑस्ट्रेलियाचा संघ ४०.४ षटकात ८४ धावांवर बाद झाला. पहिल्या डावात यांनी १६.४ षटकात ३७ धावा देत ९ विकेट घेतल्या.

वाचा-
जिम लेकर यांनी पहिल्या डावातच विक्रम केला होता. कारण कसोटी क्रिकेटमध्ये याआधी फक्त एका गोलंदाजाने अशी कामगिरी केली होती. पण लेकर इतक्यावर थांबले नाहीत. त्यांची सर्वोत्तम कामगिरी दिसणार होती ती दुसऱ्या डावात होय.

फॉलोऑन मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा कोसळला आणि ते २०५ धावांवर बाद झाले. दुसऱ्या डावात लेकर यांनी कमालच केली. ५१.२ षटकापैकी २३ षटके निर्धाव टाकली आणि ५३ धावा देत १०च्या १० फलंदाजांना बाद केले. हा विक्रम आज देखील कायम आहे.

१९९९ साली भारताच्या अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध दिल्लीत झालेल्या सामन्यात १० विकेट घेत या विक्रमाशी बरोबरी केली. पण कुंबळेने यासाठी ७४ धावा दिल्या. एका कसोटीत १९ विकेट घेण्याचा विश्व विक्रम आज देखील जिम लेकरच्या नावावर कायम आहे.

वाचा-

एका कसोटी सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
१) जिम लेकर (इंग्लंड)- मॅनजेस्टर, १९५६ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९० धावात १९ विकेट
२) सिडनी बार्न्स (इंग्लंड)- जोहान्सबर्ग, १९१३ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १५९ धावात १७ विकेट
३) नरेंद्र हिरवानी (भारत)- चेन्नई, १९८८ वेस्ट इंडिजविरुद्ध १३६ धावात १६ विकेट

या शिवाय ऑस्ट्रेलियाच्या बॉब मॅसी आणि श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन यांनी प्रत्येकी १६ विकेट घेतल्या आहेत.

जिम लेकर यांचे १९८६ साली निधन झाले. त्यांनी ४६ कसोटीत २१.२४च्या सरासरीने १९३ विकेट घेतल्या. प्रथम श्रेणीत त्यांनी ४५० सामन्यात १८.४१च्या सरासरीने १ हजार ९४४ विकेट घेतल्या होत्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here