होबार्ट: क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याचे म्हटले जाते. एखादा संघ सामन्यात सहज विजय मिळवेल असे वाटत असताना त्यांचा पराभव होऊ शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये अशीच एक मॅच झाली ज्यात कोणालाही विश्वास बसणार नाही अशी घटना घडली. क्रिकेटच्या इतिहासातच कदाचित अशी लढत झाली असेल.

ऑस्ट्रेलियात महिला लीग स्पर्धेची फायनल मॅच सुरू होती. ही लडत दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया या दोन संघात सुरू होती. द.ऑस्ट्रेलिया संघाला अखेरच्या षटकात विजयासाठी ४ धावांची गरज होती. पण तस्मानिया संघाने अखेरच्या ओव्हरमध्ये अशी कामगिरी केली ज्याचा कोणी विचार केला नाही. अखेरच्या ओव्हरमध्ये साराह कोयटे या गोलंदाजाने ३ विकेट घेतल्या तर दोन खेळाडू धावबाद झाले. द.ऑस्ट्रेलिया संघाने पाच चेंडूत ५ विकेट गमावल्या.

तिसरी कसोटी भारतासाठी अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाची; असं काय होणार जाणून घ्या…
अखेरच्या चेंडूवर द. ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी ३ धावांची गरज होती, पण ते एकच धाव करू शकले. अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कोयटेने एनी ओ नीलला बोर्ड केले. दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेण्यास फलंदाजांना यश आले. त्यानंतरच्या चार चेंडूवर चार विकेट पडल्या. तिसऱ्या चेंडूवर कोयटेने विकेट मिळवली. चौथ्या चेंडूवर फॉलो थ्रू मध्ये धावबाद केले. पाचव्या चेंडूवर तिने एला विल्सनला बाद केले. आता द.ऑस्ट्रेलिया संघाला १ चेंडूत ३ धावांची गरज होती आणि हातात फक्त एक विकेट होती. मैदानावरील अखेरच्या जोडीला एकच धाव घेता आली आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली.

IND vs AUS: तुमच्यामुळे इतरांचे नुकसान…; इंदूर कसोटीच्या आधी द्रविड घेणार कठोर निर्णय

तस्मानिया संघाच्या या जबरदस्त कामगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साराह कोयटेच्या धमाकेदार कामगिरीसाठी तिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तिच्या कामगिरीचे कौतुक सर्वजण करत आहेत. प्रथम फलंदाजी करताना तस्मानियाने ५० षटकात २६४ धावा केल्या होत्या. पावसामुळे ही लढत ४७ षटकांची करण्यात आली होती आणि द.ऑस्ट्रेलिया संघाला २४१ धावांचे टार्गेट देण्यात आले. तस्मानियाने ही लढत डकवर्थ-लईस नियमानुसार १ धावांनी जिंकली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here