कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त दोन वेळा अशी घटना घडली आहे ज्यात एखाद्या संघाने सामना फक्त १ धावाने जिंकला. न्यूझीलंडच्या आधी अशी कामगिरी ३० वर्षापूर्वी झाली होती. कसोटीत सर्वात आधी अशी कामगिरी वेस्ट इंडिज संघाने केली होती. २३ जानेवारी १९९३ रोजी वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा एडिलेड मैदानवर १ धावाने पराभव केला होता.
धावांचा विचार करता सर्वात कमी धावांनी विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी २००५ साली बर्मिंघम येथे ऑस्ट्रेलियाचा २ धावांनी पराभव केला होता. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाने १९०२ साली मॅनसेस्टर येथे इंग्लंडचा तर इंग्लंडने १९८२ साली मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाचा ३ धावांनी पराभव केला होता.
दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडवर फॉलोऑनची वेळ आली होती. तरी देखील त्यांनी विजय साकारला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही चौथी वेळ आहे जेव्हा एखाद्या संघाने फॉलोऑननंतर मॅच जिंकली. सर्वात आधी अशी कामगिरी १८९४ साली इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. त्यानंतर १९८१ मध्ये इंग्लंडने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. २००१ साली भारताने ऑस्ट्रेलियावर फॉलोऑननंतर १७१ धावांनी विजय मिळवला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times