छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेतो
पंत म्हणाला, ‘आज मी जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यावर विश्वास ठेवतो, ज्यात छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश आहे. ज्या गोष्टीं आपण आपल्या दैनंदिन जीवनात दुर्लक्ष करतो. आज प्रत्येकजण काहीतरी साध्य करण्यासाठी खूप मेहनत घेत असतो, पण रोज आनंद देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला मात्र आपण विसरलो आहोत. अपघातानंतर, मी दररोज दात घासणे तसेच उन्हात झोपण्याचा आनंद घेतो. आपले ध्येय साध्य करण्यासाठी धडपडत असताना, आपण जीवनातल्या नेहमीच्या गोष्टींना महत्त्व दिले नाही असे वाटते. हा माझ्यासाठी एक धडा आहे.
क्रिकेटला किती मिस करत आहेस?
या प्रश्नाच्या उत्तरात ऋषभ पंत म्हणतो, ‘हे सांगणे कठीण आहे, कारण माझे आयुष्य क्रिकेटसाठी आहे, पण आता मी पुन्हा माझ्या पायावर उभे राहण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. मी सकाळी उठतो आणि नंतर माझ्या फिजिओथेरपिस्टसोबत दिवसाचे पहिले फिजिओथेरपी सत्र आहे.
त्यानंतर, दुसऱ्या सत्रासाठी मी थोडी विश्रांती आणि वेळ घेतो आणि मग माझे दुसरे सत्र सुरू करतो. मी किती वेदना सहन करू शकतो त्यानुसार मी प्रशिक्षण घेतो. मी संध्याकाळी फिजिओथेरपीचे तिसरे सत्र करतो. मी उन्हात बसण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत मी पुन्हा व्यवस्थित चालू शकत नाही तोपर्यंत हा दिनक्रम चालू राहील.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times