इंदूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूर येथे तिसरी कसोटी मॅचच्या पहिल्या दिवशी धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. इंदूरच्या होळकर मैदानावरील खेळपट्टी जलद आणि फलंदाजांना मदत करणारी असल्याचे बोलले जात होते तेथे भारतीय संघ फक्त दीड सेशनमध्ये बाद झाला. भारताचा पहिला डाव १०९ धावांवर संपुष्ठात आला.

या खेळपट्टीवर चेंडू पहिल्या ओव्हरपासूनच टर्न होत होता आणि चेंडू अतिशय खाली राहत होता. खेळपट्टी अशी होती की टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला फलंदाजी करणे अशक्य होत होते.

वनडे आणि टी-२० क्रिकेटला लाजवेल असा थरार; कसोटीमध्ये ३० वर्षानंतर आणि फक्त दुसऱ्यांदा…
भारताचा कर्णधार रोहित शर्मा ज्या चेंडूवर बाद झाला ८ डिग्री इतका वळला होता. म्हणजे कसोटीच्या पहिल्या दिवशी चेंडू असा वळत होता. साधारण कसोटीत अखेरच्या दिवशी चेंडू असा वळत होता. फक्त रोहितच नाही तर अन्य फलंदाज देखील अशाच पद्धतीने बाद झाले.

कोणासाठी चेंडू किती वळला

रोहित शर्मा- ८.३ डिग्री
शुभमन गिल- ५.० डिग्री
चेतेश्वर पुजारा- ६.८ डिग्री
रविंद्र जडेजा- ५.८ डिग्री
श्रेयस अय्यर- ३.५ डिग्री

भारताचे हे सर्व फलंदाज लंच ब्रेकच्या आधी बाद झाले. मॅचच्या पहिल्या सेशनमध्ये चेंडू असा टर्न होत होता. या फलंदाजानंतर विराट कोहली आणि अन्य फलंदाजांना देखील असाच अनुभव आला.

इंदूर कसोटीच्या आधी अशी चर्चा होती की ही खेळपट्टी लाल मातीपासून तयार केली आहे, ज्यावर फलंदाज आणि जलद गोलंदाजांना मदत मिळेल. पण पहिल्या दिवशी जे काही झाले त्यावरून हा दावा चुकीचा ठरल्याचे दिसले.

भारतीय संघासाठी आली गुड न्यूज, ICCची मोठी घोषणा, २०२४च्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत मिळणार…
पहिल्या डावातील भारतीय फलंदाजांची अवस्था

रोहित शर्मा- १२
शुभमन गिल- २१
चेतेश्वर पुजारा- ०१
विराट कोहली- २२
रविंद्र जडेजा- ०४
श्रेयस अय्यर- ००
श्रीकर भरत- १७
अक्षर पटेल- १७
अश्विन- ०३
उमेश यादव- १७
मोहम्मद सिराज-००

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताने पहिल्या दोन कसोटीत दणदणीत विजय मिळवला होता. पहिल्या तिनही कसोटीत भारताने फक्त ३ दिवसात विजय मिळवाल होता. आता इंदूर कसोटीत मात्र पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताला झटका दिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ४ बाद १५६ धावा करत ४७ धावांची आघाडी घेतली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here