इंदूर: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसरी कसोटी इंदूर येथील होळकर स्टेडियमवर सुरू आहे. पहिल्या डावात भारताचा फक्त १०९ धावांत ऑलआउट झाला होता. उत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने १९७ धावा करत ८८ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा दुसरा डाव फक्त १६३ धावांत आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला आता ३ दिवसात विजयासाठी फक्त ७६ धावांची गरज आहे.

इंदूर कसोटी आतापर्यंत भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहता टीम इंडियाचा पराभव होणे निश्चित मानले जाते. एखादा चमत्काराच टीम इंडियाला या कसोटीत विजय मिळून देईल. इंदूर कसोटी भारतीय संघाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी महत्त्वाची आहे. या कसोटीत भारताने विजय मिळवला तर त्यांचे WTC फायनलमधील स्थान पक्के होईल. पण पराभव झाला तर मात्र टीम इंडियाला आणखी थोडी वाट पाहावी लागले.

आणखी एक हार्टअटॅक! बॅडमिंटन खेळताना कोर्टवर अचानक कोसळला; रुग्णालयात नेण्याआधीच निधन
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव झाला तर WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी मालिकेतील अखेरची कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागले. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली किंवा २-२ अशी ड्रॉ झाली तर त्यांना न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेच्या निकालावर अवलंबून रहावे लागले. असे झालेच तर भारताला अशी प्रार्थना करावी लागेल की श्रीलंका २ पैकी किमान १ लढत गमावेल. न्यूझीलंडसारख्या मजबूत संघाविरुद्ध विजय मिळवणे श्रीलंकेसाठी अवघड असेल तेही त्यांच्याच घरच्या मैदानावर.

Video: ‘बॉलिंग टाकतो क्विक, रन पण धावली…’; शार्दुलच्या उखाण्यावर पत्नी मिताली लाजली
ऑस्ट्रेलियासाठी समीकरण स्पष्ट आहे. WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना भारताविरुद्धच्या २ पैकी एका लढती पराभवापासून वाचायचे आहे. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची मालिका ३-० किंवा ३-१ अशी जरी गमावली तरी ते अंतिम फेरीत पोहोचतील. जर ऑस्ट्रेलियाचा ४-० असा पराभव झाला तर श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत २-० असा विजय मिळवावा लागले. असे झाले नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल होईल. ही लढत ७ जून पाहून इंग्लंडमधील ओव्हर मैदानावर होईल.

१०वीच्या मुलाला हार्टअटॅक; परीक्षा देण्यासाठी क्रिकेट मॅच सोडून आला होता,आदल्या दिवशीच…
भारताने जण अंतिम फेरीत प्रवेश केला तर WTCच्या फायनलमध्ये सलग दोन वेळा पोहोचणारा तो पहिला संघ ठरेल. या आधी आयसीसीच्या पहिल्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत देखील भारत पोहोचला होता. मात्र तेव्हा टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here