क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव ही खूप महत्त्वाची असते. एक धावही सामन्याचा रोख बदलण्यासाठी पुरेशी असते. चुकीच्या वाइडमुळे किंवा अंपायरने दिलेल्या चुकून दिलेल्या एखाद्या नो बॉलमुळे अनेक वेळा संघ सामना गमावतात. हे पाहता आयपीएलमध्ये नवा नियम लागू होणार आहे.
टी-२० लीगमध्ये पहिल्यांदाच खेळाडूंना वाइड आणि नो-बॉलच्या निर्णयावर रिव्ह्यू घेण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे. WPL म्हणजेच महिला प्रीमियर लीग ही पहिली स्पर्धा आहे ज्यात हा नियम लागू झाला होता आणि आता आयपीएलमध्येही हा नियम वापरला जाणार आहे. यावेळचे आयपीएल थोड्या वेगळ्या ढंगात पाहायला मिळणार हे स्पष्ट झाले आहे. नेमकी हीच गोष्ट डब्ल्यूपीएलमध्ये पाहायला मिळत आहे.
डीआरएस
खेळाडू आता डीआरएसचा वापर वाईड आणि नो बॉलच्या विरोधात करतील आणि प्रत्येक डावात असे करण्याच्या दोन संधी त्यांना मिळणार आहेत. त्याचबरोबर या नियमाने केवळ फलंदाजच नाही तर गोलंदाजालाही फायदा होणार आहे. सामन्यादरम्यान, जर अंपायरने एखादा बॉल वाइड दिला आणि गोलंदाजाला चेंडू सीमारेषेच्या आत आहे असे वाटले, तर तो रिव्ह्यू घेऊ शकतो, अशा परिस्थितीत, तो योग्य असल्याचे सिद्ध झाल्यास, चेंडू डॉट होईल आणि विरोधी संघाची एक धावही कमी होईल.
WPL मध्ये हरमनप्रीत कौरने वापरला हा नियम
नो बॉल, वाइडसाठी डीआरएस घेण्याचा नियम महिला आयपीएलमध्ये आधीच लागू करण्यात आला आहे. याचा वापर मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने केला होता. गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यात वाइड देण्याच्या पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले होते आणि नंतर पंचांना आपला निर्णय बदलावा लागला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times