death of senior sports journalist, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मॅच पाहिली, मृत्यूच्या काही तास लिहला होळकरांच्या क्रिकेटवरील लेख – death of senior sports journalist s dinakar who came to indore for india and australia test
इंदूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू आहे. मालिकेतील भारत २-१ ने आघाडीवर आहे. पहिल्या दोन कसोटी भारताने जिंकल्या होत्या. त्यानंतर इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने शानदार कमबॅक केले. आता चौथी कसोटी अहमदाबाद येथे होणार आहे. मात्र त्याआधी इंदूर येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
इंदूर येथे झालेली तिसऱ्या कसोटी सामन्याचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या एका पत्रकाराचे निधन झाले आहे. एका इंग्रजी दैनिकाच्या वरिष्ठ पत्रकाराचे इंदूर येथील हॉटेलमध्ये निधन झाले. डॉक्टरांनी दिलेल्या प्रथमिक माहितीनुसार संबंधित पत्रकाराला हृदय विकाराचा धक्का बसल्याचे दिसते. मध्य प्रदेश क्रिकेट संघाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. एमपीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पत्रकार एन.दिनाकर हे विजय नगर येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. सोमवारी ते बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या खोलीत सापडले होते. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विजयापेक्षा किरण नवगिरेच्या बॅटची चर्चा; स्पॉन्सर मिळाला नाही, हाताने लिहले या व्यक्तीचे नाव डॉक्टरांना असे वाटते की दिनाकर यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले असावे. पोलिस उपायुक्त सम्पत उपाध्याय यांनी सांगितले की, पत्रकाराच्या निधन प्रकरणी संपूर्ण माहिती घेऊन याबद्दल कोणतीही माहिती देता येईल. दरम्यान दिनाकर यांच्या एका सहकार्याने दिलेल्या माहितीनुसार, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटीचे रिपोर्टिंग त्यांनी केली होती. तसेच ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या अंतिम कसोटीसाठी ते अहमदाबादला रवाना होणार होते.
WPL 2023: काल फक्त झलक पाहिली, अजून बेदम धुलाई होणार; नावावर आहे हा मोठा विक्रम मंगळवारी सकाळी दिनाकर इंदूर येथून अहमदाबादसाठी जाणार होते. दिनाकर यांच्या निधनामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. क्रिकेटचे वृत्तांकन करण्यासाठी ते जगभर फिरले होते. निधनाच्या आधी त्यांनी क्रिकेटवर एक लेख लिहला होता. इंदूरमधील होळकर काळातील क्रिकेटचा वारसा हा त्यांचा अखेरचा लेख ठरला. ते ज्या वृत्तपत्रात काम करत होते त्यात मंगळवारी त्यांचा हा लेख प्रकाशीत झाला होता.