बॉलीवूडचा स्टार सुशांतसिंग राजपूतचे आत्महत्या प्रकरण सध्याच्या घडीला चांगलेच गाजते आहे. या प्रकरणामध्ये वेगवेगळी वळणं, येत असल्याचे आपण पाहत आहोत. पण या प्रकरणात आता एक सर्वात मोठा खुलासा सुशांतची एक्स एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने केल्याचे पाहायला मिळत आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर बऱ्याच जणांची चौकशी सुरु आहे. पण सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती ही नेमकी कुठे आहे, हे कोणालाही माहिती नाही. सुशांतच्या वडिलांनी रियावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे रियाने एक मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पण ती सध्या कुठे आहे, हे नेमके कोणालाही माहिती नाही. परिस्थिती अशी असताना आता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड पुढे आली आहे. अंकिता आणि सुशांत यांच्यामध्ये बरेच वर्षे अफेअर होते. त्यामुळे सुशांतला अंकिता चांगली ओळखत होती. त्यामुळे सुशांतबाबत तिने एक खुलासा केला आहे. हा खुलासा करताना अंकिता नेमकं काय म्हणाली, पाहा..

सुशांतबद्दल अंकिता म्हणाली की, ” आत्महत्येपूर्वी सुशांत हा निराश होता. त्याला नैराश्येने ग्रासले होते, असे म्हटले जात आहे. पण सुशांत निराश होणाऱ्या व्यक्तींपैकी नव्हता. तो एक साधा आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणारा व्यक्ती होता. सुशांत कधीही निराश होऊ शकतो, असे मला वाटत नाही. कारण सुशांतची मानसीकता ही सकारात्मक होती. बॉलीवूडमध्ये काम मिळालं नाही, तर आपण काय करायचं, याची प्लॅनिंगही त्याने केलेली होती.”

अंकिता पुढे म्हणाली की, ” सुशांतसमोर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आदर्श होता. त्याने जेव्हा धोनीच्या जीवनावरील सिनेमा बनवला होता तेव्हा तो धोनीमध्ये गुंतला होता. त्याला धोनीसारखेच व्हायचे होते. धोनी आणि त्याचे विचारही जुळत होते. यश आणि अपयश यांच्यामध्ये एक अंधुकश रेषा असते, हे धोनीचे वाक्य सुशांतही बोलायचा. त्यामुळे कायम सकारात्मक राहणारा सुशांत नैराश्येच्या गर्तेत जाईल, असे मला तरी वाटत नाही.”

अभिनेता
मृत्यू प्रकरणाबाबत बिहारचे
यांनी पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया दिलीय. एका न्यूज चॅनलशी बोलताना, सुशांतच्या वडिलांनी मागणी केली तरच सीबीआय चौकशी शक्य असल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलंय. मुंबई पोलिसांनी
पोलिसांना चौकशीत सहकार्य करायला हवं, असंही मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांकडून तपासात सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here