म. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

कोल्हापूरची नवोदित धावपटू सृष्टी रेडेकरने आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत १८ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. काठमांडू येथे मंगळवारी झालेल्या या स्पर्धेत भारताने तीन सांघिक सुवर्णपदके जिंकली; पण स्पर्धेतील भारताचे एकमेव वैयक्तिक सुवर्ण सृष्टीने पटकावले.

सृष्टीने पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेक पदक जिंकण्याची कामगिरी केली. तिने सहा किलोमीटरचे अंतर २४.१५ मिनिटे या वेळेत पूर्ण केले. तिने चुरशीच्या स्पर्धेत नेपाळच्या राममाया बुधा हिला (२४.१५) अक्षरशः काही शतांश सेकंदाच्या फरकाने मागे टाकले. ‘गेल्या दोन राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल क्रमांक हुकला होता. त्यामुळे या वेळी जास्त जिद्दीने सहभागी झाले होते. महाराष्ट्राबाहेरील स्पर्धेत जिंकले. यामुळे या यशाचे महत्त्व जास्त आहे,’ असे तिने सांगितले.

विजयापेक्षा किरण नवगिरेच्या बॅटची चर्चा; स्पॉन्सर मिळाला नाही, हाताने लिहले या व्यक्तीचे नाव

महाराष्ट्राबाहेरील स्पर्धेत मी यापूर्वी कधीही सुवर्णपदक जिंकले नव्हते. पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. यामुळे या यशाचा जास्त आनंद झाला आहे. स्पर्धा नक्कीच सोपी नव्हती. केवळ काही शतांश सेकंदाच्या फरकाने जिंकले आहे. हे यश माझ्यासाठी खूपच मोलाचे आहे.

– सृष्टी रेडेकर

गडहिंग्लज येथील सृष्टी ही गुवाहाटीच्या राष्ट्रीय स्पर्धेत दुसरी आली होती. त्या वेळी तिची प्रकृती प्रवासात बिघडली होती; पण तरीहीने तिने पदक जिंकले होते. याची भरपाई आशियाई स्पर्धेत करताना तिने सर्व भारतीय स्पर्धकांना मागे टाकले. तिने बेबी (२४.२१ मिनिटे), प्रियांका सी. (२३.५५), भुमेश्वरीदेवी (२५.५७) यांच्या साथीत भारतास सांघिक स्पर्धेतही विजेतेपद जिंकून दिले.

IND vs AUS: चौथी कसोटी ४८ तासांवर; मैदानावर पोहोचताच ऑस्ट्रेलियाच्या संघाला धक्काच बसला
भारताने याचबरोबर पुरुषांच्या २० वर्षांखालील; तसेच महिलांच्या स्पर्धेतही सांघिक विजेतेपद जिंकले. पुरुषांच्या वीस वर्षांखालील स्पर्धेत शिवाजी मदप्पगौद्रा दुसरा आला. त्याच वेळी विजय सावरटकरने पाचवा क्रमांक मिळवला. महिलांच्या स्पर्धेत जपानच्या युआ सारुमिदा हिने बाजी मारली. त्यात भारताची सोनिका तिसरी आली. पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत भारतास ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत एकही भारतीय अव्वल तिघांत आला नाही. हेमराज गुर्जरला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

१६ वर्षांखालील विजेती राष्ट्रीय विजेतीपेक्षा सरस

बंगालच्या रेझोआना मल्लिक हिना हिने राष्ट्रीय ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकताना महिलांच्या स्पर्धेतील विजेतीपेक्षा सरस कामगिरी केली. हिनाने ५३.२२ सेकंद या विक्रमी वेळेत शर्यत पू्र्ण करुन अव्वल क्रमांक मिळवला. तिने वीस वर्षांखालील गटातील विजेती प्रिया मोहन (५३.५५ सेकंद, कर्नाटक) आणि महिलांमधील विजेती दांडी ज्योतिका श्री (५३.२६) यांच्यापेक्षा सरस वेळ दिली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या राहुल कदम आणि ऐश्वर्या मिश्रा यांनी अनुक्रमे पुरुषांच्या आणि महिलांच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here