india vs australia, मोदींनी आधी रोहितचा हात हाती घेतला, मग ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा हात धरला; मोठा संदेश दिला – watch pm narendra modi australian pm anthony albanese presents cap rohit sharma steve smith
अहमदाबाद: बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुरुवात झाली आहे. या मालिकेत भारत २-१नं आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्हन स्मिथनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथ यांना त्यांच्या पंतप्रधानांनी अनुक्रमे नरेंद्र मोदी आणि अँथॉनी अल्बानीज यांना कॅप सुपूर्द केली. यानंतर मोदींनी रोहित आणि अल्बानीज यांचे हात हाती घेत ते उंचावून दाखवले. अल्बानीज यांच्या दुसऱ्या हातात स्मिथचा हात होता. त्यांनी तो हात उंचावत दोन्ही देशांच्या अतूट मैत्रीचं दर्शन घडवत सर्वांना अभिवादन केलं.
भारतीय क्रिकेट बोर्डाचे (बीसीसीआय) अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज यांना सन्मानित केलं. तर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पंतप्रधान मोदींचा सन्मान केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानं मोदी आणि अल्बानीज यांनी मैदानाला फेरी मारली. ऑस्ट्रेलियानं तिसरी कसोटी जिंकत मालिकेतील आव्हान कायम राखलं आहे. पाहुण्या संघानं चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यासाठी संघात कोणताही बदल केलेला नाही.
मोदी आणि अल्बानीज यांनी एका गोल्फ कार्टमधून (गोल्फ खेळाडूंना नेण्यासाठी असलेलं लहान वाहन) संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली. कसोटी सामना पाहण्यासाठी पोहोचलेल्या हजारो क्रिकेट चाहत्यांनी गोल्फ कार्टमधील मोदी आणि अल्बानीज यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. अल्बानीज बुधवारी सकाळी अहमदाबादला पोहोचले आहेत. पीच पाहून स्टीव्ह स्मिथ हसला अन् नंतर फसला, सामना सुरु होण्यापूर्वीच केली मोठी चूक भारतीय संघानं एक बदल करत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीला संधी दिली आहे. उमेश यादव या सामन्यात खेळत आहे. भारतीय संघासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय संघाला आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशीपची अंतिम फेरी गाठायची असल्यास त्यांना अहमदाबादमधील हा सामना जिंकावाच लागेल.
चौकार षटकारांचा पाऊस
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times