अहमदाबाद: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक केएस भरतने शानदार फलंदाजी करत अनेक उत्कृष्ट शॉट्स खेळले. विराट कोहलीसोबत मिडनावर असताना त्याने अर्धशतकीय भागीदारी केली. त्याने कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर मारलेले दणदणीत शॉट्स तर बघण्यासारखेच होते. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर भरतने सर्वाधिक फटकेबाजी केली.

कॅमेरून ग्रीनचा धुव्वा उडवला

भारतीय संघासाठी या मालिकेत पदार्पण करणार्‍या केएस भरतकरता पहिले तीन सामने काही खास नव्हते आणि फलंदाजीत तो काही विशेष करू शकला नाही. असे असतानाही संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला अहमदाबाद कसोटीतही संधी दिली. भरतने चौथ्या कसोटीत मात्र आपल्या बॅटची तलवार करत दमदार कामगिरी केली. त्याने डावाची सुरुवात संथपणे केली पण नंतर त्याने वेग घेतला आणि सलग दोन षटकार ठोकले.

IND vs AUS 4th Test LIVE: चौथ्या दिवसाचा टी-ब्रेक, भारत फक्त इतक्याच धावा मागे
सामन्यातील भारताच्या डावाचे पहिले सत्र संपल्यानंतर, भरत क्रीजवर उतरला, त्याने एक्सलेटरवर पाय ठेवला आणि कॅमेरॉन ग्रीनचा पहिला चेंडू जो त्याच्या डोक्यावरून जात होता, त्याच चेंडूवर उभ्या उभ्या एक शानदार षटकार मारला. यामुळे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. भरत इथेच थांबला नाही तर दुसऱ्या चेंडूवरही त्याने असाच शॉट खेळला आणि सर्वांनाच चकित केले.

भरतचे हे दोन्ही शॉट्स बघून सगळेच अवाक झाले होते. ग्रीनची धुलाई पाहून तो ही गप्प झाला होता आणि भरत पुन्हा इथेच थांबला नाही. ग्रीनच्या पुढच्या चेंडूवर त्याने शॉट मारला तो थेट बाउंड्री लाईनजवळ गेला. ग्रीनचा हा चेंडू नो बॉल होता. त्या षटकात भरतने १७ धावा कुटल्या. मात्र, नंतर मर्फीच्या गोलंदाजीवर तो ४४ धावांवर बाद झाला.

१२०४ दिवस वाट पाहिली रे! कसोटीमध्ये अखेर कोहलीचे शतक; क्रिकेटरसिकांना भावुक करेल हा Video
चौथा कसोटी सामना

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करताना ४८० धावा केल्या. भारताने प्रत्युत्तरात आतापर्यंत ५ बाद ४७२ धावांचा पल्ला गाठला आहे. भारताकडून सध्या विराट कोहली आणि अक्षर पटेल मैदानावर आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here